vijay vadettiwar

नागपुर : ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढण्याचा इशारा राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री आणि काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे. मराठ्यांवर अन्याय होऊन नये, पण ओबीसींची भरती थांबायला नको असेही त्यांनी म्हंटले आहे.

ओबीसींच्या मागण्यांसाठी राज्यभर महामोर्चे काढण्याचा इशारा विजय वडेट्टीवारांनी दिला आहे. सर्व जण शक्ती दाखवत आहेत, वेळप्रसंगी ओबीसींचीही शक्ती दाखवू. वेळ पडल्यास ओबीसींच्या मागण्यासाठी राज्यभर महामोर्चे काढू, असं मत वडेट्टीवारांनी व्यक्त केलेय.

“ओबीसींचा एल्गार दिसायलाच हवा, एक लाख पदांचा ओबीसींचा बॅकलॅाग आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र दिलंय, मराठा समाजाच्या जागा वेगळ्या ठेवून सर्व भरती होणार आहे. ओबीसींच्या प्रश्नासाठी विभागीय मेळावे घेणार आहे. ओबीसींचा अनुशेष पहिल्यांदा भरा, मग मेगा भरती करा असेही ते म्हणाले.

मराठा नेत्याने समाजाचा मेळावा घेतला, तर तो ओबीसीविरोधी ठरत नाही, मग ओबीसींचा मेळावा मराठा समाजाविरोधी कसा? असा प्रश्न वडेट्टीवारांनी उपस्थित केला. जर मेळावे घेणं चूक असेल तर निवडणूक काळात मेळावे घेणाऱ्या नेत्यांना मतं मागताना लाज वाटत नाही का? असाही खोचक सवाल वडेट्टीवारांनी विचारला होता.