विवाहितेची सातव्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या; प्रेमविवाहाचा करूण अंत

ऋतू ही मूळची राजस्थानची असून ती चेन्नईतील मामाकडे राहत होती. नोकरी करीत असताना ऋतू आणि पंकज यांची ओळख झाली. दोघांनी प्रेमप्रकरणानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, पंकजच्या कुटुंबीयांना त्यांचे लग्न मान्य नव्हते.

    नागपूर (Nagpur) : प्रेमविवाह केल्यानंतर तीन वर्षांच्या सुखी संसारानंतर विवाहितेने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ऋतू पंकज खडसे (Ritu Pankaj Khadse) (३१, रा. जयंतीनगरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंकज हा सॉफ्टवेअर अभियंता आहे. तर ऋतू हीसुद्धा इंजिनिअर आहे. ऋतू ही मूळची राजस्थानची असून ती चेन्नईतील मामाकडे राहत होती. नोकरी करीत असताना ऋतू आणि पंकज यांची ओळख झाली. दोघांनी प्रेमप्रकरणानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मात्र, पंकजच्या कुटुंबीयांना त्यांचे लग्न मान्य नव्हते.

    पंकजचे नातेवाईक सोडचिठ्ठी देण्यासाठी ऋतूवर दबाव टाकत होते. त्यामुळे ती तणावात होती. याच कारणावरून बुधवारी सकाळी ११.३० च्या सुमारास ऋतूने सातव्या मजल्यावरून खाली उडी घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी बेलतरोडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. ऋतूचे आई-वडील राजस्थानवरून नागपुरात आले. त्यांनी ऋतूचा पती आणि सासरची मंडळी छळ करीत होते. तिला घटस्फोट देण्यासाठी बळजबरी करीत होते, अशी लेखी तक्रार दिली. त्यामुळे बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.