face mask selling in nagpur

नागपूर. कोरोनावर (corona) नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिस प्रशासनाद्वारे केल्या जात असलेल्या सक्तीमुळे गत ३ दिवसात मास्कची विक्री (mask sale) ७० टक्के वाढली (increase) आहे. पूर्वी मास्क सक्तीसंदर्भात पोलिसांद्वारे कुठल्याही  प्रकारची कारवाई केली जात नसल्यामुळे लोक आपल्या मर्जीनुसार, मास्क लावत होते. परंतु, आता प्रत्येकच वाहनचालकाच्या तोंडावर मास्क दिसून येत आहे.

मार्केटमध्ये सर्जिकल मास्क, ट्रिपल लेअर मास्क, एन- ९५ शिवाय कापडी मास्कची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. पूर्वी शहरात मास्कची विक्री संख्या हजारांमध्ये होती. तर आता सक्तीनंतर हा आकडा लाखात पोहोचला लाखात आहे.  कोरोना संसर्ग लक्षात घेता, डॉक्टरांनी लोकांना बचावासाठी सावधगिरी बाळगण्यास सांगितले. यासाठी मास्क घालणे अधिक आवश्यक आहे. यानंतरही अनेक लोक असे आहेत की, कोरोनाचे गांभीर्य समजत नाहीत. ते मास्क न घालून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात टाकत आहेत.

फॅशनेबल मास्क ट्रेंडमध्ये

मार्केटमध्ये फॅशनेबल मास्क ट्रेंडमध्ये आले आहेत. सर्जिकळच्या जागी आता डिझायनर व फॅशनेबल मास्कची अधिक मागणी करीत आहेत. मार्केटमध्ये २० ते १५० रुपयापर्यंत फॅशनेबल मास्क मिळतात. यात रुमाळच्या लुकमधील मास्क १०० ते १५० रुपयात विकले जात आहेत. एक डिपार्टमेंटल स्टोरची सेल्सगर्ल माहीने सांगितले की, सध्या मुलींसाठी मास्कसोबतच कॉटनचे बनलेले स्टॉलही ट्रेंडमध्ये आले आहेत. मुली ड्रेससोबत मॅचिंग मास्क देखील खरेदी करीत आहेत. याची किंमत ५० रुपयापासून ५००

एका विक्रेत्याने सांगितले की, अनेक घरी साबणाच्या ठिकाणी हॅण्डवॉशचा उपयोग करीत आहे. पूर्वी दरमहा २०० मिलीलीटर हॅडवॉशची विक्री होत होती. ती आता वाढून १ लाखाच्या वर झाली आहे. तोंड, नाकाशिवाय हात आणि केसांना कोरोना व्हायरसपासून वाचविण्यासाठी लोक डिस्पोजेबल हेड कॅप आणि ग्लोव्जचा उपयोग करीत आहेत. दिवसभर लावा आणि रात्री सॅनिटाईज करून डस्टबिनमध्ये फेकून द्या. यात पूर्वी दरमहा २ ते ५ हजार हेडकॅपची विक्री होत होती. ती आता वाढून ४० हजारापेक्षा अधिक झाली आहे. ग्लोब्जच्या विक्रीतही ४० टक्के वाढ झाली आहे.