नागपूरमध्ये विको कंपनीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल

नागपूरमध्ये एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध विको कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या दरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    नागपूर : नागपूरमध्ये एमआयडीसीमधील सुप्रसिद्ध विको कंपनीला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. ही घटना आज (सोमवार) सकाळच्या दरम्यान घडली आहे. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाली असता, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच भीषण आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम अग्निशमन दलाकडून युद्ध पातळीवर सुरू आहे.

    दरम्यान, विको कंपनीला लागलेल्या आगीचा आणि धुराचा लोट दुरवर पसरला असून येथील परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने कोणतीही जिवीतहानी झालेली नाहीये. घटनास्थळी पोलीस पथक आणि आरोग्य सेवेत दाखल झाले असल्याची माहिती मिळाली आहे.