युवा सेनेचे वरुण सरदेसाई नागपुरात दुसऱ्यांदा दाखल; भाजपला आवाहन देण्याची पूर्वतयारी

वरुण सरदेसाई यांनी जुलै महिन्यात नागपूर दौरा केला होता. युवा सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे असतील किंवा रेकॉर्ड खराब असल्याचं पुढं आले तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं सरदेसाई यांनी सांगितलं होतं.

  नागपूर (Nagpur) : युवा सेनेचं काम राज्यात जोरदार सुरु आहे. युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांचे राज्यभरात दौरे सुरु आहेत. वरुण सरदेसाई यांनी महिनाभरात नागपूरला दुसऱ्यांदा भेट दिली आहे. युवा सेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या नेतृत्वात नागपुरात संघटनात्मक बैठक घेण्यात येणार आहे. सरदेसाई यांनी असून मागील दौऱ्यात दिलेल्या सूचनांची पूर्णतः झाली की नाही याचा घेणार आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे, अशी माहिती दिली आहे.

  नागपूरच्या युवा सेनेमध्ये गटबाजी असल्याचं सुद्धा पुढे येत होतं मात्र त्यावर पडदा टाकत युवा सेनेत कुठलीही गटबाजी नसल्याचं वरून सरदेसाई यांनी सांगितलं. गेल्या काही दिवसापूर्वी सुद्धा त्यांनी विदर्भाचा दौरा केला होता आणि युवा सेनेत काही बदल सुद्धा केले होते. त्याचा पुढचा भाग म्हणून हा दौरा असून मागच्या दौऱ्यात काही सूचना देण्यात आल्या होत्या त्या पूर्ण झाल्या की नाही. संघटना मजबूत करण्यासाठी आणखी काय करायला पाहिजे याचा आढावा या बैठकीत घेतला जाणार असून संपूर्ण पूर्व विदर्भात दौरा करून घेणार बैठका घेणार असल्याच वरून सरदेसाई यांनी सांगितलं.

  चांगलं काम करणाऱ्यांना युवा सेनेत प्राधान्य
  वरुण सरदेसाई यांनी जुलै महिन्यात नागपूर दौरा केला होता. युवा सेनेच्या कुठल्याही पदाधिकाऱ्यांवर गुन्हे असतील किंवा रेकॉर्ड खराब असल्याचं पुढं आले तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं सरदेसाई यांनी सांगितलं होतं. युवा सेनेत स्थानिक पातळी वर अनेक बदल होणार आहे. चांगलं काम करणाऱ्यांना प्राधान्य मिळेल असं युवा सेनेचे राष्ट्रीय सचिव वरुण सरदेसाई यांनी नागपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सांगितलं होतं.

  युवा सेनेची प्रभागनिहाय बांधणी
  युवा सेनेची प्रभाग निहाय बांधणी व्हावी यासाठी युवा सेना विस्तार आणि बांधणी करण्यात येणार आहे. नागपूर महापालिका निवडणुकीत सुद्धा युवासेनेला मोठं काम करायचं आहे. निवडणुका कशा लढवयाच्या एकटे की युती हा निर्णय पक्ष प्रमुख घेतात. आम्ही सगळी तयारी सुरू केली, असल्याचं वरुण सरदेसाई म्हणाले. विदर्भात युवा सेना बळकट करण्याच्या दृष्टीनं वरुण सरदेसाईंचे दौरे महत्वाचे ठरणार का हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेल.