चिमुकल्या बाळाला बदडणाऱ्या ‘त्या’ मातेलाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी बदडले

सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (a video went viral) झाला होता. या व्हिडीओ एक निर्दयी आईला स्वत:च्या चिमुकल्याला अमानुष मारहाण (inhumanely beating) करत होती.

    नागपूर (Nagpur).  सोशल मीडियावर (social media) एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल (a video went viral) झाला होता. या व्हिडीओ एक निर्दयी आईला स्वत:च्या चिमुकल्याला अमानुष मारहाण (inhumanely beating) करत होती. हा व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट झाल्यापासून अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या होत्या. अखेर या क्रूर आईला मनसेच्या महिलांनी (MNS women) धडा शिकवला आहे.

    मनसेच्यानागपूरमधील महिला पदाधिकाऱ्यांनी या आईचा शोध घेऊन तिच्या घरीच धडक दिली. यात महिला शहराध्यक्ष मनिषा पापडकर, सचिव स्वाती जैस्वाल, अचला मेसन यांनी या महिलेचा चांगलाच समाचार घेतला. सुरुवातीला त्या निर्दयी आईला बदडलं आणि नंतर तिची समस्या जाणून तिला मदतीचा हातही दिला. मनसेनं केलेल्या या कृत्याचं अनेकजण कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर मुलाला मारतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ माजली होती.

    सासुसोबत सुरू असलेल्या घरगुती वादातून एका महिलेने तिच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती. दरम्यान, माहिती कळताच अंबाझरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पीडित महिलेला ताब्यात घेऊन तिच्या बाळावर औषध उपचार केले होते.

    तिचा पती ढोलताशा पथकात काम करतो. तिला एक सहा महिन्याचे गोंडस बाळ आहे. घरगुती वादातून तिचे सासूशी अजिबात पटत नाही. या पार्श्वभूमीवर, २४ मे रोजी तिचा सासु सोबत घरात वाद सुरू झाला. सासू-सुनेचे तोंड वाजत असतानाच बेड बसलेल्या महिलेने तिच्या सहा महिन्याच्या चिमुकल्याला अमानुष मारहाण सुरू केली.

    ती त्याला वारंवार गादीवर आपटत होती. या निरागस जिवाचा आकांत सुरू असताना ती त्याला गालावर, तोंडावर,पाठीवर सारखी मारत होती. हा व्हिडीओ रविवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. ठाणेदार नरेंद्र हिवरे, उपनिरीक्षक संदीप शिंदे यांनी माहिती काढून लगेच आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. पीडित महिलेला आणि तिच्या बाळाला ताब्यात घेऊन डॉक्टर कडून बाळाची तपासणी करून घेतली. रात्र झाल्यामूळे बाळाच्या सुरक्षिततेची हमी घेऊन महिलेला सोडून दिले होते.