विदर्भातही मान्सून दाखल; आगामी ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

विदर्भात मान्सूमचे आगमन (Monsoon has arrived in Vidarbha) झाले आहे. यामुळे आगामी चार दिवस विदर्भ पट्ट्यात (the Vidarbha belt) मुसळधार पाऊस (heavy rains) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारे (Thunderstorms and strong winds) वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

  नागपूर (Nagpur).  विदर्भात मान्सूमचे आगमन (Monsoon has arrived in Vidarbha) झाले आहे. यामुळे आगामी चार दिवस विदर्भ पट्ट्यात (the Vidarbha belt) मुसळधार पाऊस (heavy rains) कोसळण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारे (Thunderstorms and strong winds) वाहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. वाऱ्यांचा ताशी वेग (The wind speed) 30 ते 40 कि.मी. प्रतितास असू शकतो अशीही शक्यता हवामान तज्ज्ञांनी (meteorologists) वर्तविली आहे.

  विदर्भातील जिल्हावार हवामानाचा अंदाज

  १० जून
  नागपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  वर्धा – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  भंडारा – एक-दोन ठिकाणी मुसळधार पाऊस, विजांच्या कडकटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  गोंदिया – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  चंद्रपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

  ११ जून
  नागपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  वर्धा – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  भंडारा – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  गोंदिया – एक-दोन ठिकाणी विजांचा कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  चंद्रपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

  १२ जून
  नागपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, तसेच वादळीवारा (वेग 30-40 किमी प्रति तास) वाहण्याची शक्यता आहे.
  वर्धा – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  भंडारा – एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  गोंदिया – एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  चंद्रपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

  १३ जून
  नागपूर – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  वर्धा – एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
  भंडारा – एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  गोंदिया – एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)
  चंद्रपूर – एक-दोन ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस, विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना आणि वादळी वारा (वेग 30-40 किमी प्रति तास)

  मुंबई-ठाण्यात रेड अलर्ट
  मुंबई, ठाणे, रायगड परिसरात रात्रीपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. याच दरम्यान हवामान विभागाने मुंबई-ठाण्यात पुढील तीन ते चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्याला रेड अलर्टही जारी करण्यात आला आहे.