आंतरजातीय विवाहावर टिपणी केल्याने खून; गोंडेगाव शिवारातील घटना

मुलीने दुसऱ्या धर्माच्या तरुणाशी विवाह केल्यानंतर दारू प्राशन करून मद्यधुंद अवस्थेत टिपणी करणाऱ्याचा चौघांनी मिळून खून केला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगाव शिवारात १८ जुलैच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

    नागपूर (Nagpur). मुलीने दुसऱ्या धर्माच्या तरुणाशी विवाह केल्यानंतर दारू प्राशन करून मद्यधुंद अवस्थेत टिपणी करणाऱ्याचा चौघांनी मिळून खून केला. ही घटना नरखेड पोलीस ठाण्यांतर्गत गोंडेगाव शिवारात १८ जुलैच्या रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली.

    रोशन शेषराव बानाईत ( ३२), रा. बेलोना, नरखेड असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून चार आरोपींना अटक केली.

    विलास जंगलूजी कवडती (४५), शुभम विलास कवडती (२४), नितेश बाळकृष्ण कवडती (२८) आणि रोहित रत्नाकर कवडती (२१) सर्व रा. गोंडेगाव, नरखेड अशी आरोपींची नावे आहेत. मृत रोशन हा मित्र माधव गणपतराव अलोणे (३०) आणि होमेश युगलसिंग बनाफर (२८) दोन्ही रा. बेलोना, नरखेड यांच्यासोबत गोंडेगाव शिवाराज दारू पित बसला होता.

    त्यावेळी रोशनने विलासला उद्देशून त्याच्या मुलीने दुसऱ्या धर्मातील मुलाशी पळून जाऊन लग्न केल्याची टिपणी केली. यातून त्यांच्यात वाद झाला. या वादातून आरोपींनी काठी व दगडाने ठेचून रोशनचा खून केला. माधव हा जखमी झाला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली.