nagpur man died suffocate sex in diffrent position at nagpur khaperkheda nrvb
भाईने पाहिली पॉर्न फिल्म, सेक्स करताना केला प्रयोग आणि त्यानंतर...

सेक्स Sex करताना बॉयफ्रेंडचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात घडली होती. या प्रकरणी गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अटक महिला ही विवाहित आहे.

नागपूर : सेक्स Sex करताना बॉयफ्रेंडचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यात घडली होती. या प्रकरणी गर्लफ्रेंडला पोलिसांनी अटक केली आहे. मृत तरुणाच्या वडिलांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. अटक महिला ही विवाहित आहे.

२७ वर्षांचा मृत तरुण त्याच्या २० वर्षीच्या मैत्रिणीला घेऊन दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवर गेला होता. तेथे ते दोघे एकमेकांच्याजवळ आले. त्या तरुणाला पॉर्न बघण्याची सवय होती. त्यातूनच त्यांनी सेक्स करताना वेगवेगळे प्रयोग करायचे ठरवले होते. यावेळेस त्या दोघांनी दोरीचा वापर केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले. त्याच वेळी ती दोरी त्याच्या गळ्याभोवतीही आवळण्यात आली होती.

सेक्स केल्यानंतर ती तरुणी बाथरूममध्ये गेली असता तो तरुण खुर्चीसह खाली कोसळला. ज्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला आणि त्याला गळफास बसला. या घटनेत त्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ती तरुणी बाथरुमच्या बाहेर आली. तो पर्यंत त्या तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली.

या घटनेनंतर मृत मुलाच्या वडिलांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मुलाच्या मृत्यूला महिला जबाबदार असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हंटले. तपासादरम्यान पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करत तिला अटक केली आहे.