नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे कोरोना पॉझिटिव्ह

कर्तव्य बजावत असताना १९ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे येथील कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

 नागपूर : नागपूरचे अतिरिक्त पोलीस आयुक्त निलेश भरणे यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्तव्य बजावत असताना १९ अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याचप्रमाणे येथील कर्मचारी आणि वरिष्ठ पोलीस निरिक्षक संतोष खांडेकर, वजीर शेख यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता ३१ तारखेपर्यंत पोलीस आयुक्त कार्यालयात भेट देणाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.

सध्या पोलीस आयुक्त कार्यालयाचं निर्जंतूकीकरण सुरु केलं आहे. काल मंगळवारी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली होती. तसेच त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली. परंतु कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता, कोरोनावर आळा घालण्यासाठी ते वर्क फ्रॉर्म होम करणार आहेत. तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये यासाठी तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाची स्थापना केली आहे.

दरम्यान, ऑगस्ट महिन्यात नागपूरमध्ये कोरोनाबाधितांची संख्या २२ हजार २२५ वर पोहोचली आहे. तर जिल्ह्यात ८१४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे नागपूरकरांची चिंता थोडी वाढली आहे.