नागपुरात अंबाझरीत फिरला की, ऑर्डनन्स फॅक्ट्रीत शिरला; शोधपथकाचा संभ्रम

शहरातीलच अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात (the Ambazari Ordnance Factory area) बिबट्याच्या पावलांचे ठसे (Leopard footprints) आढळले आहेत. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी (Security officials) या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे.

    नागपूर (Nagpur). शहरातीलच अंबाझरी ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात (the Ambazari Ordnance Factory area) बिबट्याच्या पावलांचे ठसे (Leopard footprints) आढळले आहेत. दरम्यान, सुरक्षारक्षकांनी (Security officials) या बिबट्याला प्रत्यक्ष पाहिल्याचे सांगितले असून त्यामुळे खळबळ उडाली आहे. वनविभागाने (The forest department) या भागात शोधमोहीम (a search operation) हाती घेतली असून अद्यापपर्यंत बिबट्याचा माग काढण्यात यश आलेले नाही.

    ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात बिबट्या असल्याचे सुरक्षारक्षकांनी वनविभागाला कळविले होते. परवाच्या या घटनेनंतर गुरुवार आणि शुक्रवार असे दोन दिवस वनविभागाने या परिसरात शोधमोहीम राबविली होती. यावेळी बिबट्याच्या पावलांचे ठसे (पगमार्क) आढळून आले आहेत. त्यानंतर, वनविभागाने या संपूर्ण परिसरात शोधकार्य सुरू केले आहे. मात्र, शुक्रवार रात्रीपर्यंत बिबट्या दिसून आला नाही. शोधमोहीम अद्यापही सुरू ठेवण्यात आली असून बिबट्याचा माग काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहेत. हा बिबट्या ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरातच आहे की अंबाझरीच्या इतर भागांत निघून गेला, याचीही चाचपणी करण्यात येत आहे.

    मागील महिन्यात आयटी पार्क परिसरात दिसलेल्या बिबट्याने वनविभागाला जेरीस आणले होते. सातत्याने प्रयत्न करूनही या बिबट्याला पकडण्यात तेव्हा यश आले नव्हते. आता पुन्हा एकदा शहरानजीक बिबट्याची पावले आढळली आहेत. ऑर्डनन्स फॅक्टरी भागातील बिबट्याचा व्हिडीओदेखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दरम्यान, आज, शनिवारी पुन्हा एकदा बिबट्याची शोधमोहीम राबविली जाणार आहे.