nagpur bhole petrol pump murder

नागपूर. भोले पेट्रोल पंप (bhole petrol pump) चौकात शनिवारी दिवसाढवळ्या चर्चित गुंड बाल्या उर्फ किशोर बिनेकरची (kishor binekar) हत्या ( murder) करण्यात आली. या प्रकरणातीळ ५ आरोपींना अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. एका आरोपीला शनिवारी रात्रीच अटक करण्यात आली होती, तर इतर तिघांना रविवारी सकाळी रामटेक ठाण्यांतर्गत अटक करण्यात आली.

अटकेतील आरोपींमध्ये बारा सिग्नल, इमामवाडा निवासी चेतन सुनील हजारे (३०), रजत राजा तांबे (२२), आसिम विजय लुडेरकर (२८) आणि इंदिरानगर निवासी भारत राजेंद्र पंडित (२२) चा. समावेश आहे. झिंगाबाई टाकळी निवासी अनिकेत उर्फ अभिषेक मायनवार नावाचा आरोपी अद्यापही फरार आहे. चेतनविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचे २ आणि जबरी चोरीचे प्रकरण नोंद आहे. त्याचे वडील सुनील हजारे हेसुद्धा गुंडच होते. २०११ मध्ये बाल्या आणि त्याच्या साथीदारांनी सुनील हजारे आणि त्याच्या सायीदाराचा खून केला होता. त्यावेळी चेतन केवळ ११ वर्षांचा होता.

कमी वयातच तो गुन्हेगारीत सक्रिय झाला. आपला रेकॉर्ड सांगून तो मित्रांमध्ये वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न करीत होता, मात्र प्रत्येक वेळी मित्र त्याला हा टोमणा मारून गप्प करीत होते की, आतापर्यंत तू आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याचे काहीही वाकडं करू शकला नाही. मित्र चेतनला चिडवत असल्यामुळे त्याच्या डोक्यात सतत बाल्याला संपविण्याचा विचार यायचा. १० दिवसांच्या प्लॅनिंगनंतर शनिवारी चेतनने साथीदारांसह मिळून बाल्याला मारण्याची योजना तयार केली. भोले पेट्रोल पंप चौकात दिवसाढवळ्या भर रस्त्यात त्याने बाल्याचा खून केला.

खुनानंतर घालणार होते हैदोस

सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे की, आरोपी बाल्याला संपविल्यानंतर त्याच्या कारमध्ये बसले. मात्र कार सुरू न झाल्याने आरोपींना त्यांच्या दुचाकीनेच पळ काढावा लागला. वास्तवात आरोपींची योजना खुनानंतर हैदोस घालण्याची होती. सर्व आरोपी दारूच्या नशेत होते. बाल्याला मारल्यानंतर आरोपी लालगंज परिसरातील बाल्याच्या घराजवळही हैदोस घालणार होते, मात्र कार सुरू न झाल्याने हे टळले. खून केल्यानंतर आरोपी कुठे- कुठे गेले याचा शोध घेतला जात आहे. त्यांच्याकडून शस्त्र आणि रक्‍ताने माखलेले कपडे जप्त करायचे आहेत.

अंत्ययात्रेत उसळली गर्दी

बाल्याचा खून झाल्याच्या वृत्ताने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. बाल्या जुगार अझ्च चालवत होता. यामुळे त्याचे सर्व प्रकारच्या लोकांशी संबंध होते. 2 नंबरच्या कमाईने समाजसेवाही करीत होता. रविवारी त्याच्या अंत्ययात्रेत लोकांची एकच गर्दी उसळली होती.