नागपुरचा बोर्डाचा निकाल ९९.८४ टक्के जाहीर

  नागपूर (Nagpur).  राज्य शिक्षण मंडळाने (State Board of Education) शुक्रवारी दहावीचा निकाल घोषित केला. नागपूर विभागीय शिक्षण मंडळाचा निकाल (Nagpur Divisional Board of Education) 99.84 टक्के लागला आहे. कोरोनामुळे विद्यार्थ्यांची (the corona) परीक्षा घेण्यात न आल्याने निकाल कसा जाहीर करावा हा मोठा प्रश्न होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या (the students) नववी आणि दहावीच्या गुणदानातून झालेल्या मूल्यांकनानुसार निकाल जाहीर करण्यात आला. याआधारे 48375 विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहे.

  नागपूर बोर्डाने यंदा 1 लाख 55 हजार 506 विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. यातील 1 लाख 55 हजार 505 विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करण्यात आले. प्राप्त माहितीप्रमाणे 1 लाख 52 हजार 263 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या सरासरीनुसार 99.84 टक्के आहे. विशेष म्हणजे नागपूर विभागात सर्वाधिक 99.95 टक्के निकाल वर्धा जिल्ह्याचा आहे. यात मुलींची टक्केवारी 99.88 टक्के असून मुलांची टक्केवारी 99.80 टक्के आहे.

  नागपूर मंडळातील जिल्हानिहाय निकाल
  वर्धा        –   99.95 टक्के
  भंडारा     –   99.84 टक्के
  चंद्रपूर     –   99.64 टक्के
  नागपूर   –   99.86 टक्के
  गडचिरोली –  99.89 टक्के
  गोंदिया   –    99.92 टक्के