नागपुरात रविवारी आढळले १० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

विवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आतापर्यंतची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची नोंद 03 लाख 40 हजार ११२ इतकी करण्यात आली.

    नागपूर (Nagpur) : कोरोनाची दुसरी लाट (the second wave of corona) ओसरली असली (has subsided) तरी शहरात दररोज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळत असल्याने प्रशासन (the administration) चिंतेत आहे. दरम्यान नागपूर मनपाच्या (The Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (the health department) रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात १० नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (corona positive patients) आढळून आले आहेत. यामुळे शहरातील आतापर्यंतची एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येची नोंद 03 लाख 40 हजार ११२ इतकी करण्यात आली. (Today’s Corona Report Of Nagpur)

    नागपूर शहरात रविवारी ४२ कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या नोंदविण्यात आली. कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने कोरोना टेस्टिंगची संख्या वाढविली आहे. दरम्यान नागपुरात रविवारपर्यंत ३५३१ नागरिकांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली. यापैकी ३५१६ कोरोना टेस्टिंग निगेटिव्ह आढळून आली. मनपाच्या आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सुविधेमुळे रविवारी शहरातील ०५ कोरोना बाधित रुग्ण् पूर्णपणे रोगमुक्त झाले आहेत.

    कोरोनामुळे आजसुद्धा एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. प्रशासनाने सध्या कोरोना व्हॅक्सिनेशनवर भर दिला आहे. शहरात रविवारपर्यंत १२ लाख २७ हजार ९४६ नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. याचप्रमाणे ०५ लाख १९ हजार ७७७ नागरिकांना कोरोनाची दुसरी लस टोचण्यात आली आहे. कोरोना लसीकरणाची रविवारपर्यंतची एकूण आकडेवारी १७ लाख ४७ हजार ७२३ इतकी नोंदविली गेली.