नागपुरात शनिवारी आढळले ११ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न

    नागपूर (Nagpur).  कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्वोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात कोरोना प्रतिबंधक लसिकरणाची (Corona preventive vaccination) आकडेवारी वाढतीवर आहे. मात्र, यासोबतच कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे.

    नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाकडून (health department) शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात ४८ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यासह नागपूर शहरात शनिवारी ११ कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) नोंद करण्यात आली.

    आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांना प्रभावी उपचार दिले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून शहरातील ०२ कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मनपाच्या आरोग्य केंद्रावर आज ३४२८ कोरोना संशयित नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी ३४१५ चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. शहरात शनिवारी एकाही कोरोना अॅक्टिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

    मनपाच्या लसिकरण केंद्रांवर शनिवारपर्यंत १३ लाख ०२ हजार २८३ नागरिकांना कोरोनाचा पहिला डोज तर ०५ लाख ८० हजार ०६१ नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोज देण्यात आला. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.