नागपुरात मंगळवारी आढळले ८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; कोरोना ऍक्टिव्ह रुग्णसंख्या आणि प्रशासनाची चिंता वाढतीवर

    नागपूर (Nagpur). कोरोनाची तिसरी संभाव्य लाट रोखण्यासाठी राज्य शासनाने सर्वोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात कोरोना प्रतिबंधक लसिकरणाची (Corona preventive vaccination) आकडेवारी वाढतीवर आहे. मात्र, यासोबतच कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) वाढती संख्या प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. नागपूर मनपाच्या (Nagpur Municipal Corporation’s) आरोग्य विभागाकडून (health department) मंगळवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार शहरात 57 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यासह नागपूर शहरात मंगळवारी 08 कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची (corona active patients) नोंद करण्यात आली.

    आरोग्य विभागाकडून कोरोना रुग्णांना प्रभावी उपचार दिले जात आहे. याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असून शहरातील 07 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. मनपाच्या आरोग्य केंद्रावर आज 2986 कोरोना संशयित नागरिकांची कोरोना चाचणी घेण्यात आली. यापैकी 2976 चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. शहरात मंगळवारी एकाही कोरोना अॅक्टिव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही.

    मनपाच्या लसिकरण केंद्रांवर मंगळवारपर्यंत 12 लाख 74 हजार 937 नागरिकांना कोरोनाचा पहिला डोज तर 5 लाख 51 हजार 115 नागरिकांना कोरोनाच्या दुसऱ्या लसीचा डोज देण्यात आला. गणेशोत्सव काळात नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत कोरोनाची लागण होण्यापासून स्वतःचा बचाव करावा, असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले.