कोरोनाला हरविण्याचा प्रशासनाचा संकल्प; नागपुरात मंगळवारी आढळले ०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (out of control corona) आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने (The health department) आकाश-पाताळ एकवटले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

    नागपूर (Nagpur).  जिल्ह्यातील हाताबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (out of control corona) आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य विभागाने (The health department) आकाश-पाताळ एकवटले. त्याचा सकारात्मक परिणाम आता दिसू लागला आहे.

    दरम्यान जिल्ह्यात मंगळवारी ०८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण (Corona Positive patient in Nagpur) आढळून आले. यामध्ये शहरातील ०७, ग्रामीण भागातील ०१ रुग्णांचा समावेश आहे. नागपूर शहरात कोरोनाचे सध्या २२० रुग्ण आहेत. कोरोनामुळे मंगळवारी एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद प्राप्त अहवालात नाही. नागपूर शहरात आज एकूण ४९७२ रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. कोरोनामुक्त झालेल्या १४ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

    आरोग्य विभागातर्फे शहरात आज ८ लाख ४२ हजार रुग्णांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. यासह ३ लाख ३२ हजार रुग्णांना कोरोनाची दुसरी लस देण्यात आली. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायजर यांचा कटाक्षाने वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.