नागपुरात सोमवारी कोरोना पाॅझटिव्ह रुग्णसंख्या ११ वर; ‘जाणून घ्या!’ कोरोना Active रुग्णांची आकडेवारी

नागपूर महानगर पालिकेचा (the Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभाग (health department) आणि जिल्हा प्रशासनाच्या (the district administration) संयुक्त प्रयत्नांनी (A joint effort by the Nagpur Municipal Corporation’s health department and the district administration) शहरात नियंत्रणाबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (the corona out of control) नियंत्रणात आणली.

    नागपूर (Nagpur).  नागपूर महानगर पालिकेचा (the Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभाग (health department) आणि जिल्हा प्रशासनाच्या (the district administration) संयुक्त प्रयत्नांनी (A joint effort by the Nagpur Municipal Corporation’s health department and the district administration) शहरात नियंत्रणाबाहेर गेलेली कोरोनाची स्थिती (the corona out of control) नियंत्रणात आणली. दुसरी बाब म्हणजे, नागपुरकरांनी कोरोना नियमांची केलेली अंमलबजावणी होय. आरोग्य विभागाकडून सोमवारी प्राप्त अहवालानुसार शहरात सोमवारी ११ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले.

    आरोग्य विभागाकडून सोमवारी ४३६० रुग्णांची कोरोना चाचणी घेण्यात आली. सध्यापर्यंतचा एकूण कोरोना चाचण्यांचा आकडा २२ लाख ३१ हजार ४९७ इतका आहे. कोरोनामुळे शहरात आज एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद नाही. आज कोरोनातून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण २० आहे. एकूण बरे होणारी रुग्णसंख्या 03 लाख 29 हजार आहे. शहरात कोरोना Active रुग्णांची आकडेवारी ३३९ इतकी नोंदविण्यात आली.

    लाॅकडाउन काळात जिल्ह्यातील नागरिकांची होणारी गैरसोय विचारात घेऊन प्रशासनाने यात नियमांसह शिथिलता दिली आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.