नागपुरात गुरुवारी केवळ ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद; Corona Active रुग्णसंख्येतील घट सुरूच

नागपूर शहरात एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. आज शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मनपाच्या आरोग्य विभागाकडून गुरुवारी २८६३ नागरिकांनी कोरोना टेस्टिंग करवून घेतली.

    नागपूर (Nagpur) : नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (the health department) राबवविण्यात येत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनेशन (The corona vaccination) आणि प्रभावी उपचार पद्धतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. यामुळे शहरात गुरुवारी अत्यंत कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona-positive patients) नोंद करण्यात आली.

    नागपूर महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाकडून (the health department) राबवविण्यात येत असलेल्या कोरोना व्हॅक्सिनेशन (The corona vaccination) आणि प्रभावी उपचार पद्धतीचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. यामुळे शहरात गुरुवारी अत्यंत कमी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची (corona-positive patients) नोंद करण्यात आली. प्राप्त अहवालानुसार शहरात गुरुवारी केवळ ०३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. कोरोनामुक्त (corona-free) झालेल्या रुग्णांची संख्या 2 आहे.

    नागपूर शहरात एकूण कोरोना अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १७ आहे. आज शहरात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याची नोंद नाही. मनपाच्या आरोग्य विभागाकडून गुरुवारी २८६३ नागरिकांनी कोरोना टेस्टिंग करवून घेतली. यापैकी २८५९ नागरिकांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला. कोरोनाची तिसरी लाट रोखण्यासाठी कोरोना व्हॅक्सिनेशन हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. या पार्श्वभूमीवर शहरात गुरुवारी १४ लाख ८९ हजार ७४५ नागरिकांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. यासह ०७ लाख ७६ हजार ४२० नागरिकांनी कोरोनाची दुसऱ्या क्रमांकाची लस टोचून घेतली.

    शहरात गुरुवारी प्राप्त झालेला कोरोना लसिकरणाचा एकूण आकडा २२ लाख ६६ हजार १६५ आहे. कोरोनाची तिसरी लाट रोखणे ही आपली सार्वजनिक जबाबदारी आहे. नागरिकांनी याकरिता कोरोना लसीचे दोन्ही डोज अवश्य घ्यावे आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करावे, असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्क’तर्फे करण्यात येत आहे.