अभिजित वंजारी पहिल्या फेरीत ४८५० मतांनी आघाडीवर

राज्य विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदान गणनेच्या पहिल्या फेरीत नागपूर विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार असलेले संदीप जोशी यांना ४८५० मतांनी मात देत आघाडी मिळविली आहे. वंजारी यांना पहिल्या फेरीत १२ हजार ६७१ मिळाली. या तुलनेत भाजपचे संदीप जोशी यांना ७७६७ मते मिळाली आहेत. पदवीधर मतदार संघाच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीत वर्धेचे स्वतंत्र उमेदवार निलेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना प्रथम फेरीत १७४२ मते मिळाली.

नागपूर (Nagpur).  राज्य विधान परिषदेच्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीच्या मतदान गणनेच्या पहिल्या फेरीत नागपूर विभागातून महाविकास आघाडीचे उमेदवार अभिजित वंजारी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भाजपचे उमेदवार असलेले संदीप जोशी यांना ४८५० मतांनी मात देत आघाडी मिळविली आहे. वंजारी यांना पहिल्या फेरीत १२ हजार ६७१ मिळाली. या तुलनेत भाजपचे संदीप जोशी यांना ७७६७ मते मिळाली आहेत. पदवीधर मतदार संघाच्या गुरुवारी जाहीर झालेल्या निवडणूक निकालाच्या पहिल्या फेरीत वर्धेचे स्वतंत्र उमेदवार निलेश कराळे तिसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना प्रथम फेरीत १७४२ मते मिळाली.

नागपूर विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीमध्ये पहिल्या २८ हजार मतांपैकी २ हजार २३४ अवैध व २५ हजार ७६६ मते वैध ठरलीत. यामध्ये पुढील प्रमाणे उमेदवारांना पहिल्या पसंतीचे मते मिळाली आहे. विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी जाहीर केलेली पहिल्या पसंतीची उमेदवार निहायमते पुढील प्रमाणे आहेत. अभिजीत वंजारी १२ हजार ६१७, संदीप जोशी ७ हजार ७६७, राजेंद्रकुमार चौधरी ४७, इंजीनियर राहुल वानखेडे ७६४, ॲङ सुनिता पाटील ४०, अतुलकुमार खोब्रागडे १ हजार ७३४, अमित मेश्राम १०, प्रशांत डेकाटे ३६०, नितीन रोंघे ६६, नितेश कराळे १ हजार ७४२, डॉ. प्रकाश रामटेके ३८, बबन तायवाडे २५, ॲड.मोहम्मद शाकीर अ.गफ्फार ६, सी.ए. राजेंद्र भुतडा ४३५, प्रा.डॉ. विनोद राऊत ४२, ॲड. विरेंद्र कुमार जायस्वाल २५, शरद जीवतोडे ८, प्रा.संगीता बढे १६ आणि इंजीनियर संजय नासरे २४ मते पडली आहेत. दुस-या फेरीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.