नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण

आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असून, ट्विटरद्वारे त्यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली असून, ट्विटरद्वारे त्यांनी स्वत: कोरोनाची लागण झाल्याची माहिती दिली आहे. तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.

तुकाराम मुंढे यांनी ट्वीटमध्ये लिहिलं की, माझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मला कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तरीही नियम आणि अटींप्रमाणे मी स्वत:ला अलगीकरण केलं आहे. मी विनंती करतो की, मागील १४ दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करावी. नागपूरमधील कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी मी घरातूनच काम करत आहे. आपण नक्कीच ही लढाई जिंकू.

ऑगस्ट महिन्यात नागपूरमध्ये कोरोना रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत होती. त्यामुळे कोरोना विषाणूवर आळा घालण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन योजना आखल्या आहेत. कोरोना रुग्णांवर उपचारासाठी बेड उपलब्ध व्हावेत आणि या रुग्णांची कोणतीही लुटमार होऊ नये, यासाठी नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी विशेष पथकाचं गठन केलं आहे.