नागपूर महानगरपालिका ७५ ऑक्सिजन उद्यान विकसित करणार, महापौरांच्या हस्ते उपक्रमाला सुरुवात

जागतिक पर्यावरण दिवसाच्या (World Environment Day) निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे (Nagpur Municipal Corporation) स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड (oxygenated trees) करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे.

    नागपूर (Nagpur).  जागतिक पर्यावरण दिवसाच्या (World Environment Day) निमित्ताने नागपूर महानगरपालिकेतर्फे (Nagpur Municipal Corporation) स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षी प्राणवायू देणाऱ्या वृक्षांची लागवड (oxygenated trees) करुन शहरात 75 ऑक्सिजन झोनची निर्मिती केली जाणार आहे, अशी घोषणा महापौर दयाशंकर तिवारी (Mayor Dayashankar Tiwari) यांनी केली.

    जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने शनिवारी (5 जून) नागपुरातील गांधीबाग उद्यानात 1200 प्राणवायू वृक्षांची लागवड करण्याची सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी आमदार विकास कुंभारे, आमदार प्रवीण दटके, नगरसेवक संजय बालपांडे, नगरसेविका विद्या कन्हेरे, सरला नायक, उपायुक्त रवींद्र भेलावे, अमोल चौरपगार, नागमोते उपस्थित होते.

    यावेळी महापौर दयाशंकर तिवारी यांनी सांगितले, उत्तर नागपूर, मध्य नागपूर आणि पूर्व नागपूर येथे वृक्षांची संख्या फारच कमी आहे. मनपातर्फे सध्या अस्तित्वात असलेल्या उद्यानात, खुल्या भूखंडावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येईल. येथे वनौषधी सुद्धा लावण्यात येतील. याचा लाभ आयुर्वेदचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना होईल. पोहरा नदीच्या काठालगत सुध्दा वृक्षारोपण करण्यात येणार आहे. महापौर आणि अन्य उपस्थित नागरिकांनी वृक्षारोपण करुन मोहिमेचा शुभारंभ केला.