महाराष्ट्र हादरला! नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार

पीडित १७ वर्षीय मुलगी दक्षिण नागपुरात राहाते. २९ जुलैला रात्री तिचा नातेवाइकांसोबत वाद झाला. त्यामुळे ती घरातून निघाली. मेडिकल चौकात एका रिक्षाचालकाला तिने मानस चौकात सोडायला लावले. चालकाने तिला मानस चौकात सोडले. साना हा रिक्षात बसला होता. त्याने मुलीकडे चौकशी केली. तणावात असल्याने तिने त्याला काहीही सांगितले नाही.

  नागपुरात 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. घरातून निघून गेलेल्या अल्पवीय मुलीला एका ऑटो चालकाने मदत करण्याच्या बहाण्याने रुमवर नेत आपल्या मित्रांसोबत सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी पहाटे मोमीनपुरा जवळ मेयो रुग्णालयाच्या समोर पीडित मुलीला सोडून नराधमांनी पोबारा केला. दरम्यान, या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेतले असून दोघेजण फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

  काय घडलं त्या रात्री?

  पीडित १७ वर्षीय मुलगी दक्षिण नागपुरात राहाते. २९ जुलैला रात्री तिचा नातेवाइकांसोबत वाद झाला. त्यामुळे ती घरातून निघाली. मेडिकल चौकात एका रिक्षाचालकाला तिने मानस चौकात सोडायला लावले. चालकाने तिला मानस चौकात सोडले. साना हा रिक्षात बसला होता. त्याने मुलीकडे चौकशी केली. तणावात असल्याने तिने त्याला काहीही सांगितले नाही.

  मदतीच्या बहाण्याने सानाने तिला ऑटोत बसवले. टिमकी परिसरातील एका घरी नेले. तेथे त्याचे अन्य तीन साथीदाराही आले. चौघांनी मुलीवर सामूहिक अत्याचार केला. मध्यरात्री सानाने तिला मेयो हॉस्पिटल चौकात सोडले.तिथे आणखी एका रिक्षाचालकाला ती दिसली. त्याने साथीदाराच्या मदतीने रिक्षातच पीडित मुलीवर अत्याचार केला. मुलीला मेयो चौकात सोडून दोघे पसार झाले.

  पीडित मुलगी त्याच ठिकाणी पडून असल्याचे बघून जवळच असलेल्या रेल्वे पोलिसांना याची माहिती काही नागरिकांनी दिली. रेल्वे पोलिसांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने माहिती दिली. चाइल्ड लाईन ने रेल्वे पोलिसांना याची माहिती दिली आणि त्यांनी चार आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले आहे.

  मोहम्मद शहानवाज ऊर्फ साना मोहम्मद रशीद (वय २५ रा.) मोहम्मद तौसिफ मोहम्मद युसूफ (वय २६),मोहम्मद मुशीर (२३ तिन्ही रा. मोमीनपुरा) आणि त्यांचा एक साथीदार अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

  दरम्यान, हे प्रकरण सीताबर्डी पोलीस हद्दीतील असल्याने ते आरोपी आणि मुलीला सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आता सीताबर्डी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून आणखी कोणी दुष्कृत्यात सहभागी आहे का याचाही शोध पोलीस घेत आहेत.