Nana Patole vs Nitin Gadkari

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे. पहिल्यांदा पटोले यांनी गडकरींच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. आता गडकरींनी पटोलेंविरोधात अर्ज दाखल करुन जोरदार पलटवार केला आहे.

    नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज केला आहे. पटोले यांचे निवडणूक याचिकेमधील प्रतिज्ञापत्र बेकायदेशीर आहे, असा दावा करणारा अर्ज त्यांनी न्यायालयात दाखल केला आहे. पहिल्यांदा पटोले यांनी गडकरींच्याविरोधात अर्ज दाखल केला होता. आता गडकरींनी पटोलेंविरोधात अर्ज दाखल करुन जोरदार पलटवार केला आहे.

    2019 च्या लोकसभा निवडणुकीत नितीन गडकरी नागपूरमधून विजयी झाले आहेत. तत्पूर्वी त्यांनी निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात उत्पन्नाची खरी माहिती दिली नाही, असा दावा नाना पटोले यांनी केला आहे. उत्पन्नान स्त्रोत शेती असल्याचे नमूद केले तसेच त्यांनी कायद्यातील विविध तरतूदी न नियांचे पालन केले नाही. त्यामुळे त्यांची निवड रद्द करून नव्याने निवडणूक घेण्यात यावी, असे पटोले यांचे म्हणणे आहे. गडकरी यांना ही याचिका प्राथमिक टप्प्यावरच खारिज करुन घ्यायची आहे. त्यामुळे त्यांनी दिवाणी प्रक्रिया संहितेतील सातव्या ऑर्डरमधील नियम 11 (ए) अंतर्गत हा अर्ज दाखल केला आहे.

    या प्रकरणावर न्या. अतुल चांदूरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, पटोले यांनी या अर्जावर उत्तर सादर करण्यासाठी वेळ मागितला. त्यामुळे न्यायालयाने प्रकरणावरील सुनावणी 24 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली. गडकरी यांच्यावतीने वरिष्ठ अॅड. सुनील मनोहर तर पटोले यांच्यावतीने अॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली.