नागपुरात शनिवारी केवळ ०२ कोरोना रुग्णांची नोंद; कोरोना विरुद्धच्या लढ्यात आरोग्य प्रशासनाला यश

कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने प्रभावी उपचार पद्धतीवर भर दिला आहे. शहरात शनिवारी 06 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचे नोंदविले गेले. यासह शनिवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची शहरात अद्यापपर्यंत नोंद नाही.

    नागपूर (Nagpur). मनपाच्या आरोग्य विभागाच्या अथक प्रयत्नांमुळे नागपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घसरली आहे. शहरात शनिवारी फक्त 02 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. सद्यस्थितीत नागपूर शहरात केवळ 41 कोरोना अॅक्टिव्ह रुग्ण नोंदविण्यात आले.

    कोरोनाचा प्रादूर्भाव होऊ नये याकरिता आरोग्य विभागाने प्रभावी उपचार पद्धतीवर भर दिला आहे. शहरात शनिवारी 06 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाल्याचे नोंदविले गेले. यासह शनिवारी एकाही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची शहरात अद्यापपर्यंत नोंद नाही. शनिवारी शहरात 2288 कोरोना संशयित रुग्णांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली.

    यापैकी 2282 टेस्टिंग कोरोना निगेटिव्ह आढळून आली. शहरात सध्यापर्यंत 12 लाख 54 हजार 156 नागरिकांना कोरोनाची पहिली लस तर 5 लाख 34 हजार 285 जणांना कोरोनाची दुसरी लस टोचण्यात आली. शहरात सध्यापर्यंत 17 लाख 88 हजार 441 नागरिकांचे कोरोना लसिकरण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला.