कोरोना चाचणीसाठी आता थुंकीचे नमुने वापरणार, नागपुरातील संशोधन संस्थेने शोधला नवा पर्याय -आयसीएमआरची मान्यता

नागपुरातील निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं नवीन पर्याय शोधून काढला आहे. थुंकीचे नमुने(Spit sample) आता कोरोना चाचणीसाठी वापरता येणार आहे.

    नागपूर : आता कोरोना चाचणीसाठी(Corona Test) नाका तोंडातुन स्वॅब देण्याची गरज पाडणार नाही. कारण नागपुरातील निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन केंद्रानं नवीन पर्याय शोधून काढला आहे. थुंकीचे नमुने(Spit sample) आता कोरोना चाचणीसाठी वापरता येणार आहे. आयसीएमआरनं यासाठी मान्यता दिली आहे. या पद्धतीमुळं बराच वेळ आणि पैसा वाचणार आहे.


    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत टेस्टिंगचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. टेस्टिंग लॅबवर ताण येत आहे. त्यामुळं अहवाल यायला तीन ते चार दिवस लागत आहेत. त्यामुळे उपचारालाही विलंब होत आहे. उपचाराअभावी अनेकांचा जीव जात आहे. यावर पर्याय म्हणून नागपूरच्या निरी अर्थात राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेने नवीन पर्याय शोधून काढला. सलाईन मध्ये वापरलं जाणारं ग्लुकोज तोंडात घेऊन त्यांची गुळल्या करून ती थुंकी एका बॉटलमध्ये घ्यायची. त्या थुंकीचा वापर आरटीपीसीआर टेस्ट साठी केला जाणार आहे.