ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराची आत्महत्या

नागपुरातील लिहिगाव येथे ही घटना घडली आहे. गजानन धांडे असे आत्महत्या करणाऱ्या उमेदवारांचे नाव आहे. महालगाव ग्रामपंचायतची निवडणुक ते लढत होते. आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

नागपूर : राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. सध्या ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. अशातच नागपुरात ग्रामपंचायत निवडणूक लढविणाऱ्या उमेद्वाराने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.

नागपुरातील लिहिगाव येथे ही घटना घडली आहे. गजानन धांडे असे आत्महत्या करणाऱ्या उमेदवारांचे नाव आहे. महालगाव ग्रामपंचायतची निवडणुक ते लढत होते. आत्महत्ये मागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

राज्यात १४ हजार पेक्षा अधिक ग्रामपंचायतीसाठी निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला आहे. यासाठी १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. १८ जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.