रातुम नागपूर विद्यापीठाचा ऐतिहासिक निर्णय, विद्यार्थ्यांना दिलासा देत शुल्कमाफीची घोषणा

कोरोनाच्या (corona) काळात शाळा, महाविद्यालय (schools and colleges) बंद असल्यामुळे फी माफ व्हावी, अशी मागणी पालकांकडून (Parents) होत आहे. पण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) शुल्कमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

  नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या (corona) काळात शाळा, महाविद्यालय (schools and colleges) बंद असल्यामुळे फी माफ व्हावी, अशी मागणी पालकांकडून (Parents) होत आहे. पण, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात (Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur University) शुल्कमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

  नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. सुभाष चौधरी यांच्या नेतृत्वात विद्यार्थी व पालकांना दिलासादायक असा ऐतिहासिक शुल्कमाफीचा घेतलेला निर्णय आज जाहीर करण्यात आला. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील शुल्कमाफी घोषणा करणारे नागपूर विद्यापीठ हे प्रथम विद्यापीठ ठरले आहे. त्यामुळे लॉक डाऊन काळात अनेक विद्यार्थ्यांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

  शिष्यवृत्ती मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना सूट नाही. मागसवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जात असते. शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होत असते. त्यामुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आधीच शुल्क माफीचा लाभ देण्यात आला आहे. त्यामुळे मागसवर्गीय विद्यार्थ्यांना 15 रुपये शुल्क माफ करण्यात आले नाही. त्यामुळे शिष्यवृत्ती खात्यात जमा झाल्यावर या विद्यार्थ्यांना फी भरण्यास मुभा देण्यात आली आहे.

  अशी आहे शुल्कमाफी
  प्रयोगशाळा शुल्क पदवी अभ्यासक्रम – ६०० रुपये सवलत
  मानवशास्त्र, ९०० रुपये सवलत
  विज्ञान व तंत्रज्ञान शाखा – ५० टक्के सवलत
  पदव्युत्तर अभ्यासक्रम – १ हजार रुपये- ५० टक्के शुल्क
  ग्रंथालय शुल्क – ५० टक्के शुल्क
  विकास शुल्क – ५० टक्के शुल्क

  विविध गुणदर्शक शुल्क, मॅगजीन शुल्क, संगणक, क्रीडा निधी, वैद्यकीय मदत निधी, सहायता निधी, अश्‍वमेध, विद्यार्थी सहायता, युथ फेस्टीवल असे वेगवेगळे शुल्क १०० टक्के सवलत देण्यात आली आहे. मात्र ओळखपत्र, नोंदणी शुल्क आणि विमा निधीमध्ये कुठलीही सवलत देण्यात आली नाही.