कोरोनाची अर्ध्याधिक लढाई नागपुरकरांनी जिंकली; रविवारी ३५७ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळले; मृत्यूसंख्या आजही १५च्या खालीच

महानगर पालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या (municipal health department and the district administration) संयुक्त परिश्रमापुढे (the joint efforts) अखेर कोरोनाला नमते घ्यावेच लागले. यातही नागपुरकरांनी दाखविलेली शिस्त (The discipline shown by Nagpurkar) कोरोनाला हरविण्यात प्रभावी ठरली आहे (effective in defeating Corona). जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मिळालेल्या अहवालानुसार (As per the report received from the district administration) सध्या नागपुरात 6781 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत.

    नागपूर (Nagpur).  महानगर पालिकेचा आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या (municipal health department and the district administration) संयुक्त परिश्रमापुढे (the joint efforts) अखेर कोरोनाला नमते घ्यावेच लागले. यातही नागपुरकरांनी दाखविलेली शिस्त (The discipline shown by Nagpurkar) कोरोनाला हरविण्यात प्रभावी ठरली आहे (effective in defeating Corona). जिल्हा प्रशासनाकडून रविवारी मिळालेल्या अहवालानुसार (As per the report received from the district administration) सध्या नागपुरात 6781 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण शिल्लक राहिले आहेत. नागपुरात 30 मे रोजी 357 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये शहरातील 220 रुग्ण, ग्रामीण भागातील 132 आणि जिल्ह्याबाहेरील 5 रुग्ण आहेत.

    जिल्हा प्रशासनाने रविवारी कोरोनामुळे केवळ 13 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद केली आहे. यामध्ये शहरातील 5, ग्रामीण भागातील 3 आणि जिल्ह्याबाहेरील 5 रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज १४०३७ व्यक्तींच्या कोरोना चाचण्या घेण्यात आल्या. यामध्ये शहरातील १०३९१ रुग्ण आणि ग्रामीण भागातील ३६४६ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त झालेल्या १०४१ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    कोरोना संक्रमितांची एकूण संख्या ४.७४ लाखांवर पोहोचली आहे. सध्या एकूण कोरोना Active रुग्णांची संख्या ६७८१ नोंदविण्यात आली आहे. यामध्ये शहरातील ४०७३ रुग्ण आणि ग्रामीण भागातील २७०८ रुग्ण आहेत. कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४.५८ लाखांवर पोहोचली आहे. तर एकूण मृत्यूसंख्या ८८९२ इतकी असल्याचे रविवारी नोंदविण्यात आले.