राष्ट्रवादी काँग्रेसला नागपूरसाठी हवेत संपर्कमंत्री; नवाब मलिक यांच्या नावाची चर्चा सुरू

महापालिकेच्या येत्या निवडणुकीत (upcoming municipal elections) अपेक्षित रिझल्ट आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने उपराजधानीला तडफदार संपर्क मंत्री द्यावेत, अशी सुप्त मागणी होऊ लागली आहे. अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुसफूस सुरू झाल्याचे समजते.

    नागपूर (Nagpur).  महापालिकेच्या येत्या निवडणुकीत (upcoming municipal elections) अपेक्षित रिझल्ट आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीच्या तयारीसाठी पक्षाने उपराजधानीला तडफदार संपर्क मंत्री द्यावेत, अशी सुप्त मागणी होऊ लागली आहे. अल्पसंख्यक मंत्री नवाब मलिक (Minority Minister Nawab Malik) यांच्या नावाची चर्चा सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर धुसफूस सुरू झाल्याचे समजते. (the controversy has started)

    अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने संपर्क मंत्रिपदही रिक्त आहे. सरकारने दिलीप वळसे पाटील यांना गृह खाते, तर नवाब मलिक यांच्याकडे गोंदियाच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवली. अनिल देशमुख हे स्थानिक असल्याने कोणत्याही वेळी भेट शक्य होत होती. कार्यकर्त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न चालायचे. आता मुंबईतील मंत्री राहिल्यास त्यांच्याशी संपर्क केव्हा व कसा होईल, कार्यकर्ते व लोकांचे प्रश्न कसे सोडवावेत, असा प्रश्न स्थानिक नेत्यांसमोर आहे. नवाब मलिक यांनी विदर्भाचा दौरा केलेला नाही. गोंदियात देखील ते केव्हा व कितीदा येतील आणि आले तरी नागपूरला किती वेळ देतील, अशी शंका कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

    प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासारख्या तडफदार नेत्यांनी उपराजधानीचे पालकत्व स्वीकारावे, अशी मागणी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे. त्यांच्यामुळे स्थानिक प्रशासनावर वचक राहिल, लोकांचे प्रश्न सोडवता येतील. संघटन बळकट होण्यास मदत होईल, अशी भूमिका एका नेत्याने व्यक्त केली.

    पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शहरात जनसंपर्क अभियान सुरू केले. करोनामुळे जनसंपर्क तात्पुरते थांबवले आहे. पटेल यांच्यासोबत प्रश्न सोडवणारे संपर्क मंत्री राहिल्यास अभियानास आणखी बळ मिळेल. पक्षाने याचा विचार करावा. महापालिका निवडणुकीची तयारी चालली आहे. त्यामुळे पवार वा पाटील यांच्यासारख्या मंत्र्यांमुळे पक्षाला निश्चितच लाभ होईल. पक्षाने दोन जागा लढण्याचा निर्धार केला आहे. त्याची तयारीदेखील आतापासून करता येईल, असे अन्य एका नेत्याने स्पष्ट केले.