Nitin Gadkari

महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari ) एका मुलाखतीत म्हटलं आहे.

तीन कृषी कायद्याविरोधात (Agricultural Laws) दिल्लीच्या सिंघु सीमेवर शेतकरी आंदोलन (Farmers Agitation) करत आहेत. या आंदोलनाला अनेक पक्षांनी पाठिंबा (Support) दिला आहे. दरम्यान, तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी (Nitin Gadkari ) एका मुलाखतीत म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनावर नितीन गडकरींची पहिली प्रतिक्रिया…

नागपुरात मी सेंद्रीय शेती करतो, माझी पत्नी ते सगळं काम पाहते. नागपूर येथील प्रताप नगर येथे तो भाजीपाला विकला जातो. तिथे शेतीतल्या उत्पादनांना चांगला भाव मिळतो. मला बाजार समितीत जाण्याची गरज नाही. जर कायदा झाला नसता तर हे घडलं असतं का? तीनपैकी एकही कायदा शेतकऱ्यांच्या विरोधात नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांच्या नेत्यांनी या बिलांचं समर्थन केलं आहे. काही लोक दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी शेतकरी म्हणून देशातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की हे कायदे तुमच्या हिताचेच आहेत असंही नितीन गडकरींनी म्हटलं आहे.

राजकारण जरुर केलं जावं त्यात काही वाद नाही. मात्र शेतकऱ्यांचा प्रश्न महत्त्वाचा आहे त्यामध्ये राजकारण कुणीही आणू नये. हे कायदे शेतकऱ्यांच्या बाजूचे आहेत. शेतकरी हिताचेच हे कायदे आहेत. बरं शेतकऱ्याला शेतमाल कुठे विकायचा आहे? थेट विकायचा आहे की बाजार समितीत जाऊन विकायचा आहे हा निर्णय सर्वस्वी त्यांचा असणार आहे असंही गडकरींनी म्हटलं आहे.