कोणी कितीही स्ट्रॅटजी केली तरी २०२४ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदीच्याच नेतृत्वात सरकार येणार : देवेंद्र फडणवीस

कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे; मात्र कोणी कितीही स्ट्रॅटजी (strategy) तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकी नंतर (the 2024 elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल यात शंका नाही, असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition in the Assembly) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे.

    नागपूर (Nagpur).  कोणी कोणाला भेटावे यासंदर्भात प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे. मात्र कोणी कितीही स्ट्रॅटजी (strategy) तयार केली तरी २०२४ च्या निवडणुकी नंतर (the 2024 elections) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन होईल यात शंका नाही असा विश्वास विधानसभेचे विरोधी पक्षनेते (Leader of the Opposition in the Assembly) देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केला आहे. नागपूर विमानतळावर (Nagpur airport) ते माध्यमांशी बोलत होते.

    वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती
    कमी उपस्थितीत निघणाऱ्या पायी वारी संदर्भात वारकऱ्यांना परवानगी द्यायला हवी होती. मुळातच त्यांनी पन्नास लोकांच्या उपस्थितीत वारीची परवानगी मागितली होती. शिवाय मार्गात येणाऱ्या गावांचे ठरावही घेतले होते. त्यामुळे सरकारने परवानगी द्यायला हवी होती अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

    नक्षलवाद्यांच्या पत्रकाची चौकशी करा
    मराठा आरक्षणासंदर्भातील या आंदोलनात भाजपचे नेते सहभागी होते. यापूर्वीही आमचे सरकार असताना ज्या ज्या ठिकाणी मराठा मोर्चे निघायचे तिथले आमदार त्या मोर्चामध्ये सहभागी होत होते. समाजाच्या मागणीला लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असणे स्वाभाविक आहे असेही फडणवीस यावेळी म्हणाले. नक्षल विचार हा मुळातच विविध समाजामध्ये तेढ निर्माण करणार आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी मराठा आरक्षणा संदर्भात काढलेल्या पत्रकाची सखोल चौकशी केली पाहिजे अशी मागणी फडणवीस यांनी यावेळी केली.