‘ए आई! मला खेळायला जाऊ दे ना’; मुलांनी धरला पालकांकडे हट्ट

कोरोनाच्या भितीमुळे (Because of Coronas fears) ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये (during summer days) लहान मुलांना कोंडून ठेवावे लागत आहे (to keep children locked up). मुले आता या परिस्थितीला चांगलेच कंटाळले आहेत. लहान मुलांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट (to provide a hut for children to go out of the house) कसा पुरवायचा? या विचारांमध्ये पालक आहेत.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाच्या भितीमुळे (Because of Coronas fears) ऐन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये (during summer days) लहान मुलांना कोंडून ठेवावे लागत आहे (to keep children locked up). मुले आता या परिस्थितीला चांगलेच कंटाळले आहेत. लहान मुलांचा घराबाहेर पडण्याचा हट्ट (to provide a hut for children to go out of the house) कसा पुरवायचा? या विचारांमध्ये पालक आहेत.

    उन्हाळ्याच्या सुट्या म्हणजे बच्चे कंपनीची चंगळ. अभ्यासाचे टेन्शन सोडून मनसोक्त खेळण्याचे दिवस. बरेचजण बाहेरगावी नातेवाइकांकडे किंवा फिरण्यासाठी जातात. पण, सलग उन्हाळ्यात कोरोनाने कहर केला. संपूर्ण जगालाच जायबंदी केले. सुमारे ५० दिवसांपासून नागपूरकरही घरातच बंदिस्त आहेत. मुलांनाही चार भितींआडच दिवस घालवावे लागत आहेत. काही दिवसांमध्ये जिल्ह्यातील कोरोनारुग्णांचा आलेख कमी होऊ लागला आहे. त्यासोबत भीतीही काहीशी कमी झाली.

    नागपूरकर घराबाहेर पडू लागले आहेत. वडीलधाऱ्यांचे अनुकरण करणाऱ्या लहान मुलांचाही घराबाहेरचे जग खुणावू लागले आहे. फार लांब नाही, पण किमान घराजवळ खेळायला जाऊ देण्याचा हट्ट घराघरांतून सुरू आहे. काहींनी नेहमीप्रमाणे आजी, आत्या, मामा, मावशीकडे सोडून देण्याचा हट्ट धरला आहे. मुलांचे रुसवे, फुगवे काढण्यासाठी पालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे.

    क्रियेटिव्हिटीच झाली बंद
    तिसरी लाट मुलांसाठी अधिक घातक ठरणार असल्याची सर्वत्र चर्चा आहे. यामुळे मुलांची काळजी आत्तापासूनच घेतली जात आहे. त्यांना हवे नको ते घरीच मिळते. पण, अगदी दाराबाहेरही पडू दिले जात नाही. बालपण क्रियेटिव्हिटी डेव्हलप होण्याचा काळ. परंतु, कोरोनाच्या भीतीने क्रियेटिव्हिटीलाच जायबंदी करून टाकले आहे.