नागपुरात कोरोनाची लाट संपण्याच्या वाटेवर; बुधवारी ८१ नवीन कोरोना रुग्ण आढळले, प्रशासनाच्या प्रयत्नांना सलाम

कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत. परिणामी, नागपुरकरांनी कोरोनावर मात केली आहे.

    नागपूर (Nagpur). कोरोना प्रादूर्भावाची स्थिती नियंत्रणात आणण्यात मनपाचा आरोग्य विभाग (The Corporation’s health department) आणि जिल्हा प्रशासनास (the district administration) मोठे यश आहे. दोन्ही विभागातील कर्मचारी, डाॅक्टर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न (The efforts) मार्गी लागले आहेत. परिणामी, नागपुरकरांनी कोरोनावर मात केली आहे. शहरात बुधवारी ९ जून रोजी केवळ ८१ कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामध्ये शहरातील ४२, ग्रामीण भागातील ३६ आणि जिल्ह्याबाहेरील 3 रुग्ण आहेत.

    शहरात बुधवारी ०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली. यामध्ये शहरातील ०२, ग्रामीण भागातील शून्य आणि जिल्ह्याबाहेरील 03 रुग्ण आहेत. जिल्ह्यात आज १०६३५ कोरोना संशयित रुग्णांची चाचणी करण्यात आली. कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्या ३२२ रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे.

    सध्या नागपूर शहरात २६७६ कोरोना Active रुग्ण आहेत. तर ०४ लाख ६४ हजार रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंतची एकूण मृतांची संख्या ८९७८ इतकी नोंदविण्यात आली आहे. कोरोना रुग्णांचे प्रमाण कमी झाले असले तरी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.