गुरुवारी कोव्हिशिल्डची निःशुल्क लस नागपुरातील मनपा केन्द्रांमध्ये उपलब्ध होणार

मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण (vaccinated on a large scale) करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे.

    नागपूर (Nagpur) : राज्य शासनाकडून (the state government) कोव्हीशिल्ड लसींचा (Covishield vaccine) पर्याप्त पुरवठा प्राप्त झाल्यामुळे १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील वयोगटातील सर्व नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह (Nagpur Municipal Corporation) शासकीय केन्द्रावर (Government Center) गुरुवारी १९ ऑगस्ट रोजी सकाळी १० ते संध्याकाळी ५ पर्यंत होणार आहे. या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

    मनपा तर्फे नागरिकांना मोठया प्रमाणात लसीकरण (vaccinated on a large scale) करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. नागरिकांना प्रथम डोज, दूसरा डोज घेण्यासाठी लस मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. (Covishield vaccine will be given free to Nagpur citizens on Thursday)


    लसीकरणसाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने नोंदणी करता येईल, ही माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. तसेच ‘ड्राइव्ह इन व्हॅक्सीनेशन’ केंद्रावरसुद्धा १८ वर्षे आणि ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांचे कोव्हिशिल्डचे लसीकरण सकाळी १० ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत होईल, ही माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी (Medical Health Officer) डॉ. संजय चिलकर (Dr. Sanjay Chilkar) यांनी दिली.

    तसेच १८ वर्षांवरील व ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन पहिला व दुसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय,कामठी रोड व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र, एम्स, आयसोलेशन रुग्णालय, इमामबाडा, इंदिरा गांधी रुग्णालय, गांधीनगर, मनपा स्त्री रुग्णालय, पाचपावली, प्रगती हाल, दिघोरी येथे उपलब्ध आहे.