नागपुरात सोमवारी केवळ 1 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद; पण तिसऱ्या लाटेची चिंता कायम

नागपूर मनपा प्रशासनाच्या (the Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या (the health department) वतीने राबविण्यात येत असलेल्या कोरोना लसिकरणाचे सकारात्मक परिणाम (The positive effects) दिसू लागले आहेत. परिणामी शहरात सोमवारी केवळ 01 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे.

    नागपूर (Nagpur): नागपूर मनपा प्रशासनाच्या (the Nagpur Municipal Corporation) आरोग्य विभागाच्या (the health department) वतीने राबविण्यात येत असलेल्या कोरोना लसिकरणाचे सकारात्मक परिणाम (The positive effects) दिसू लागले आहेत. परिणामी शहरात सोमवारी केवळ 01 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला आहे. नागपूर शहरात सध्या 18 कोरोना अॅक्टिव्ह केसेस आहेत.

    आरोग्य विभागाच्या रुग्णालयांकडून उपचार घेणारे 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. विभागाकडून सोमवारी 1624 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची कोरोना टेस्टिंग करण्यात आली. यापैकी 1622 टेस्टिंगचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आढळून आला. तुर्तास कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. शहरात कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी व्हॅक्सिनेशनचे प्रमाणही वाढविण्यात आले आहे. शहरात सोमवारी 14 लाख 60 हजार 776 नागरिकांनी कोरोनाची पहिली लस टोचून घेतली.

    कोरोनाची दुसरी लस टोचणाऱ्यांची संख्या 07 लाख 54 हजार 686 आहे. अशाप्रकारे नागपूर शहरात सोमवारी 22 लाख 15 हजार 462 नागरिकांचे लसिकरण करण्यात आले. कोरोनाची तिसरी लाट रोखण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. याकरिता प्रत्येकाने कोरोना लसिकरण करावे आणि कोरोना प्रतिबंधक नियमावलीचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन ‘नवराष्ट्र न्यूज नेटवर्क टीम’कडून केले जात आहे.