पंढरपुरचे विठ्ठल मंदिर वारीसाठी उघडे करा; पालख्यांना मर्यादित संख्येने परवानगी द्यावी- विश्व हिंदू परिषदेचे आंदोलन

पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी (the Ashadi Yatra in Pandharpur) पालख्यांना मर्यादित संख्येने वारीला परवानगी देत विठ्ठल दर्शन खुले करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) (Vishva Hindu Parishad) केल्या आहेत. या मागण्यांच्या समर्थनार्थ विहिंपनं राज्यभरात भजन आंदोलन पुकारलं आहे.

  नागपूर (Nagpur). पंढरपूरच्या आषाढी यात्रेसाठी (the Ashadi Yatra in Pandharpur) पालख्यांना मर्यादित संख्येने वारीला परवानगी देत विठ्ठल दर्शन खुले करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने (विहिंप) (Vishva Hindu Parishad) केल्या आहेत. या मागण्यांच्या समर्थनार्थ विहिंपनं राज्यभरात भजन आंदोलन पुकारलं आहे. नागपूरातही विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात शहरातील किर्तनकार, भजन मंडळी (kirtankars, bhajan groups), निरुपणकार, साधूसंतांनी शनिवारी संविधान चौकात भजन आंदोलन केले. (Pandharpur Ashadi Wari 2021)

  करोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका पाहता आषाढी वारीसाठी राज्य सरकारने पायी वारीवर निर्बंध आणले आहेत. शासनाकडून खबरदारी म्हणून केवळ मानाच्या दहा पालखी सोहळ्यांच्या आषाढी वारी सोहळ्यास परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या पालखी सोहळ्यांना पायी वारी प्रस्थान ठिकाणापासून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तेथून पंढरपूरकडे १.५ किमी. अंतर प्रातिनिधिक स्वरूपात पायीवारी करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

  मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाचा विविध आध्यत्मिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. अध्यात्मिक आघाडीनंतर आता विहिंपनं देखील पायी वारीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी विहिंपनं भजन आंदोलन पुकारलं आहे.

  विश्व वारकरी सेवा संस्थेनंही या आंदोलनात भाग घेतला आहे. राज्यातील मंदिरे उघडण्यात यावे यासाठी संविधान चौकात दिंडी भजन आंदोलन करण्यात आले. तसंच, मर्यादित संख्येमध्ये पंढपूरची पायी वारी करू देण्यात यावी, या मुख्य मागण्यांच्या समर्थनार्थ विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात शहरातील कीर्तनकार, भजन मंडळी, निरुपणकार, साधूसंतांनी शनिवारी संविधान चौकात भजन आंदोलन केले.

  काय आहे वारकऱ्यांचे म्हणणे?
  मानाच्या दहा पालख्यांसोबत लहानमोठ्या चारशे पालख्या असतात. त्या प्रत्येक पालखीसोबत किमान चार जणांना परवानगी देण्यात यावी, मानाच्या पालखीसोबत पन्नास जणांना पायी वारी करू द्यावी, एकादशीनंतर पुढील पंधरा दिवस दररोज दहा ते वीस वाऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन करू द्यावे, लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना वारी करू द्यावी.

  यात्रेकरूंना आरटीपीसीर चाचणीचा निगेटिव्ह अहवाल अनिवार्य करावा, एकादशीपासून संपूर्ण राज्यातील मंदिरांमध्ये चातुर्मास सेवा आणि इतर धार्मिक अनुष्ठान पन्नास टक्के उपस्थितीसह सुरू करण्यास अनुमती द्यावी, या मागण्या वारकऱ्यांनी केल्या आहेत.