Devendra Fadnavis criticizes Congress state president Nana Patole

एक महत्वाचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की, रूग्णसंख्या वाढलेली असल्याने रूग्णालयांमध्ये त्यांना जागा अपुरी पडत आहे. म्हणून मागील वर्षी सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यावेळी ज्या रूग्णलायांनी कोविड रूग्णालय म्हणून विशेष कक्ष सुरू केले होते, ते नंतर अनेकांनी बंद केले. आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील. त्यादृष्टीने देखील आपल्याला लक्ष घालावं लागेल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    नागपूरमधील कोरोना संसर्गाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या आढावा बैठकीनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. काही लोकं गृह विलगीकरणात असूनही रस्त्यांवर फिरत आहेत, त्यामुळे ते मोठ्याप्रमाणावर करोना पसरवत आहेत. नियम डावलून जे रस्त्यांवर फिरत आहेत, आपला शिक्का मिटवत आहेत, त्यांना थेट उचलून संस्थात्मक विलगीकरण केंद्रात नेलं पाहिजे आणि त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे. अशी भूमिका फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केली आहे.

    एक महत्वाचा मुद्दा आम्ही मांडलेला आहे की, रूग्णसंख्या वाढलेली असल्याने रूग्णालयांमध्ये त्यांना जागा अपुरी पडत आहे. म्हणून मागील वर्षी सारखी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे. त्यावेळी ज्या रूग्णलायांनी कोविड रूग्णालय म्हणून विशेष कक्ष सुरू केले होते, ते नंतर अनेकांनी बंद केले. आता कोविड हॉस्पिटल आणि कोविड बेड्स हे पुन्हा वाढवावे लागतील. त्यादृष्टीने देखील आपल्याला लक्ष घालावं लागेल. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

    पुढे म्हणाले की, कोविड बेड्स ज्यांना आवश्यक आहे, म्हणजे ज्यांमध्ये लक्षणं आहेत व प्रकृती गंभीर आहे त्यांच्या करिता आज बेड्स नाहीत, म्हणून तुम्ही पाहिलं असेल आता मृत्यू संख्येत सर्वाधिक मृत्यू हे नागपूरमधील आहेत. यांच कारणं रूग्णालय उपलब्ध होत नाही, त्यामुळे तत्काळ बेड्स वाढवण्याची आम्ही मागणी केली आहे.