इंधन दरवाढीविरुद्ध सामाजिक संघटनांचा आक्रोश; नागपुरात ‘भीक मांगो आंदोलन’

इंधनाच्या दररोज होणाऱ्या दरवाढीच्या विरोधात (daily increase in fuel prices) राष्ट्रीय स्वाभिमान परिषद (Rashtriya Swabhiman Parishad) , लोकजागृती मोर्चा व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जून रोजी सक्करदरा चौक येथे 'भिख मांगो आंदोलन' (Bhik Mango Andolan) आयोजित करण्यात आले.

    नागपूर (Nagpur).  इंधनाच्या दररोज होणाऱ्या दरवाढीच्या विरोधात (daily increase in fuel prices) राष्ट्रीय स्वाभिमान परिषद (Rashtriya Swabhiman Parishad) , लोकजागृती मोर्चा व प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 19 जून रोजी सक्करदरा चौक येथे ‘भिख मांगो आंदोलन’ (Bhik Mango Andolan) आयोजित करण्यात आले.

    इंधन दरवाढीच्या संदर्भात केंद्र सरकार व राज्य सरकार दोघेही जनतेवर जुलमी कर आकारीत आहेत व ओरड केली असता एकमेकांकडे बोटे दाखवित आहे. मात्र त्यावर कुठलाही तोडगा काढीत नाहीत. उलटपक्षी जनतेला गृहीत धरून त्यांची पिळवणूक होत आहे. याचा अर्थ सरकार कसेही करून जनतेकडून पैसा उकळीत आहे. म्हणजेच सरकार भिकेला लागली आहे.

    भिकेला लागलेल्या सरकारला मदत करण्याकरिता राष्ट्रीय स्वाभिमान परिषदेचे मुन्नाजी महाजन, लोकजागृती मोर्चाचे संयोजक अँड. रमण सेनाड, प्रहार जनशक्ती पक्षाचे कॅप्टन दिलीप जयस्वाल यांच्या नेतृत्वात भीक मांगो आंदोलन आयोजित करण्यात आले. नागरिकांनी देखील मोठया प्रमाणात सहभागी होऊन भिक्षापात्रात रोख रक्कम टाकली.


    या आंदोलनातून जमा होणारी भीक सोमवार दि. 21 जून रोजी मा जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून केंद्र सरकार व राज्य सरकारला समप्रमाणात पाठविण्यात येणार आहे. या आंदोलनाला भगवानदासजी राठी, Adv. राजेन्द्र गिल्लूरकर, शुभम शुक्ला, शशि ठाकुर, शैलेन्द्र खडसे, राहुल सेन, अमोल ईशपांडे, राहुल बावणे, प्रशांत मंगदे , गौरव शाहकार, सविता पांडे, रजनी घोडेस्वार, नरेश निमजे, प्रशांत गणोरकर, मिलिंद चव्हाण, निखिल भुते, सुरज सूर्यवंशी, शैलेश मारशिंगे, नाना देवईकर, प्रदीप शेंडे, अभिषेक गडपायले, शुभम रामटेके, अजय वाघ, लोकेश लांजेवार, चंद्रशेखर खोंडे, अक्षय क्षीरसागर इत्यादी अनेक पदाधिकारी उपस्थित होते.