नागपूरमध्ये 10 वर्षांपासून नाव बदलून राहत होता ‘हा’ तरूण, तालिबानशी कनेक्शन असल्याचा पोलिसांचा संशय; फोटो सोशल मीडियावर व्हायरल…

नागपूरच्या दिघोरी परिसरात मागील अनेक वर्षांपासून नूर मोहम्मद आपलं नाव बदलून भारतात निवास करत होता. 16 जून 2021 ला त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर नूरचं मेडिकल चेकअप केलं असता, त्याच्या शरीरावर गोळीचे निशाण आढळून आले. अफगाणिस्तान दूतावासियांकडून तालिबानी असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मदला नागपूरमधून तात्काळ त्याच्या देशात पाठवण्यात आलं.

  नागपूर : तालिबानी दहशतवाद्यांनी अफगाणिस्तानावर कब्जा केल्यानंतर एका फोेटो सोशल मीडियावर सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा फोटोे नूर मोहम्मद उर्फ अब्दुल हकचा असल्याचं सांगितलं जात आहे. नूरबाबत मोेठा खुलासा करण्यात आला आहे की, या व्यक्तीला 23 जून 2021 रोजी नागपूरमधून अफगाणिस्तानात पाठवण्यात आले. त्याचं वय 30 असून तोे मागील 10 वर्षांपासून नाव आणि रूप बदलून नागपूरमध्ये राहत होता. नूरचं तालिबान्यांशी कनेक्शन असल्याची माहिती मिळताच नागपूर पोलीस सतर्क झाले आहे. ज्या ठिकाणी नूर राहत होता, त्याठिकाणी जाऊन पोलीस चौकशी करत आहेत.

  नागपूरच्या दिघोरी परिसरात मागील अनेक वर्षांपासून नूर मोहम्मद आपलं नाव बदलून भारतात निवास करत होता. 16 जून 2021 ला त्याला अटक करण्यात आली. त्यानंतर नूरचं मेडिकल चेकअप केलं असता, त्याच्या शरीरावर गोळीचे निशाण आढळून आले. अफगाणिस्तान दूतावासियांकडून तालिबानी असल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहम्मदला नागपूरमधून तात्काळ त्याच्या देशात पाठवण्यात आलं.

  टूरिस्ट वीजामुळे  नागपूरमध्ये भरारी

  नागपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नूर मोहम्मद 2010 मध्ये फक्त 6 महिन्यांसाठी पर्यटक व्हिसावर महाराष्ट्रात आला होता. त्याने UNHRC मध्ये निर्वासित दर्जासाठी अर्ज केला होता. परंतु त्यांच्या अर्ज फेटाळण्यात आला होता. त्यानंतर त्याने सोंग घेऊन आणि आपलं नाव बदलून नागपूरमध्ये निवास करण्याचं ठरवलं होतं. नागपूरमध्ये तो मागील 10 वर्षांपासून राहत होता. परंतु तालिबानी असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळताच, त्याने नागपूर सोडून अफगाणिस्तानात झेप घेतली. नूर हा अविवाहीत असून नागपूरमध्ये घोंगडी किंवा चादर विकण्याचं काम करत होता.

  नूरच्या भावाचे होते तालिबानशी संबंध

  नूर मोहम्मदचं खरं नाव अब्दुल हक असं आहे आणि त्याचा भाऊ तालिबानसोबत काम करत होता.मागील वर्षी नूरने एका धारदार शस्त्रासह सोशल मी़डियावर एक फोटो पोस्ट केला होता. परंतु त्याला अटक केल्यानंतर त्याच्या डाव्या खांद्यावर गोळीचे निशाण आढळून आले होते. त्यानंतर त्याच्या संपूर्ण सोशल मीडिया संबंधीत गोष्टींची तपासणी केली असता, तो काही दहशतवाद्यांना फॉलो करताना आढळला.