अवैध दारूविक्रीवर पोलिसांचा छापा, पण सुमारे ५०० नागरिकांकडून  वाहनांवर तुफान दगडफेक

पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली असून टोली वस्तीला छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत १८ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकेनगर व टोली वस्ती ही अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यासाठी नावाजलेली आहे. टोलीतील अवैध धंद्यांना काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून टोलीत पोलिसांचा छापा पडला नव्हता. टोलीत अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली.

    नागपूर : अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध धंदे सुरू आहेत. टोली परिसरातील अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिस पथकावर नागरिकांनी तुफान दगडफेक केली. ही खळबळजनक घटना सोमवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने पोलिसांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह सुमारे ४०० पोलिसांचा ताफा टोलीत पोहोचला.

    पोलिसांनी दगडफेक करणाऱ्यांची धरपकड सुरू केली असून टोली वस्तीला छावणीचे स्वरूप आले आहे. रात्री उशिरापर्यंत १८ व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामटेकेनगर व टोली वस्ती ही अवैध दारू विक्री आणि जुगाराच्या अड्ड्यासाठी नावाजलेली आहे. टोलीतील अवैध धंद्यांना काही पोलिस कर्मचाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून टोलीत पोलिसांचा छापा पडला नव्हता. टोलीत अवैध दारू विक्री होत असल्याची माहिती अजनी पोलिसांना मिळाली.

    अजनी पोलिसांचे पथक कारवाईसाठी तेथे वाहनाने पोहोचले. त्यांनी एका दारू अड्ड्यावर छापा घातला. तेथून पाच ते सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना पोलिस वाहनातून नेत असल्याची माहिती वाऱ्यासारखी पसरली. परिसरातील महिला, लहान मुले व नागरिकांनी पोलिसांना घेराव घातला. पोलिसांच्या वाहनांवर तुफान दगडफेक केली.