१२७ ग्रामपंचायतींसाठी आज मतदान; नागपूर जिल्ह्यातील निवडणूकीचा आढावा

मतदानासाठी पोलिंग पार्टी गुरुवारी रवाना झाल्या. जिल्ह्यात "एकही संवेदनशील केंद्र नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली.

नागपूर. जिल्ह्यातील १२७ ग्रामपंचायतीसाठी आज शुक्रवारला मतदान होत आहे. “एकूण १३० ग्रामपंचायतीतून कळमेश्वर तालुक्यातील सोनपूर, सावनेर तालुक्यातील जटामखोरा बिनविरोध तर कुही तालुक्यातील देवळी येथील निवडणूक रद्द झाल्याने १२७ ग्रामपंचायतीची निवडणूक आज शुक्रवारळा होत आहे. जिल्ह्यात ४८५ मतदान केंद्रांवर ३०१५ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. १३ तालुक्यातील ४८५ मतदान केंद्रावर १४५५ मतदान अधिकारी-कर्म चाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात मतदान केंद्रनिहाय अध्यक्ष 485 केंद्रप्रमुख व मतदान केंद्र अधिकार्‍यांचा समावेश आहे. . १२७ ग्रामपंचायतीच्या ४३१ एकूण प्रभागामध्ये ४११ प्रभागात मतदान होणार आहे. ११९६ जागेतील १०८६ जागेसाठी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. याची ११ डिसेंबरला अधिसूचना जारी करण्यात आली होती. १३ तालुक्यामध्ये तहसीलदारांच्या माध्यमातून निवडणुक कार्यक्रम घोषीत करण्यात आला होता. त्यानुसार १५ जानेवारीला सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार आहे.

या तालुक्यांचा समावेश

काटोल तालुक्यात ३ ग्रामपंचायतीच्या ९ प्रभागामध्ये २३ जागांसाठी, नरखेड तालुक्यात १७ ग्रामपंचायतीमध्ये ५५ प्रभागातील ५४ प्रभागासाठी १३३ जागांसाठी, सावनेर ११ ग्रामपंचायत ३८ प्रभाग ९६ जागा, कळमेश्वर ५ ग्रामपंचायत १३ प्रभाग ३७ जागा, रामटेक ९ ग्रामपंचायत ३२ प्रभातून ३१ प्रभागात ८२ जागांसाठी, पारशिवनी तालुका १० ग्रामपंचायती ३१ प्रभाग ८० जागा, मौदा ७ ग्रामपंचायत ३१ प्रभाग ५८ जागांसाठी २० प्रभाग, कामठी ९ ग्रामपंचायत ३१ प्रभाग ८५ जागा, उमरेड १४ ग्रामपंचायत ४३ प्रभाग ९४ जागेसाठी ३९ प्रभागात, भिवापूर ३ ग्रामपंचायत ९ प्रभाग २७ जागांसाठी ९ प्रभाग, कुही २५ ग्रामपंचायती ७८ प्रभाग १८६ जागेसाठी ७२ प्रभाग, नागपूर ग्रामणी ११ ग्रामपंचायती ४७ प्रभाग १३२ जागेसाठी ४७ प्रभाग व हिंगणा तालुक्‍यातील ५ ग्रामपंचायतीत १७ प्रभागामध्ये ५९ जागांसाठी मतदान होत आहे.

जिल्ह्यात संवेदनशील केंद्र नाही

मतदानासाठी पोलिंग पार्टी गुरुवारी रवाना झाल्या. जिल्ह्यात “एकही संवेदनशील केंद्र नसल्याची माहिती उपजिल्हाधिकारी तथा प्रभारी ग्रामपंचायत निवडणूक अधिकारी डॉ. शिवनंदा लंगडापुरे यांनी दिली. १८ जानेवारीला सकाळी १० वाजता मतमोजणी व निकाल घोषित केल्या जाणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोविड प्रतिबंधात्मक सुरक्षा उपायांचे पाळन करून मतदार प्रक्रिया पूर्ण केळी जाणार आहे. तहसीलदार व तालुकास्तरीय आरोग्य विभागाच्यावतीने कोविड सुरक्षा उपायोजना करण्यात येणार आहे.