राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा : ऊर्जामंत्र्यांचा दिलासा!

नागपूरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस जिमखाना येथे बैठक पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते.

    नागपूर.  कोविड-१९च्या (Covid-19) निर्बंधांच्या पार्श्वभुमीवर यंदा सर्वानाच गणेशोत्सव (Ganesh Utsav)गर्दी टाळून साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारने केले आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळानी (public Ganesh Mandal) देखील मुर्तीची उंची ते उत्सवाचे स्वरूप यामध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चार दिवसांवर गणरायाचे आगमन आले असतानाच राज्यातील सार्वजनिक गणेश मंडळांना घरगुती दराने वीज पुरवठा करण्याची घोषणा राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केली आहे. या घोषणेमुळे  गणेशोत्सव मंडळांना आर्थिक दिलासा मिळणार आहे.

    नागपूरात गणेशोत्सव शांततेत
    नागपूरात गणेशोत्सव शांततेत पार पडावा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आणि शांतता समितीच्या पदाधिकाऱ्यांची पोलीस जिमखाना येथे बैठक पार पडली. नागपूर शहरातील सर्व पोलीस झोनमध्ये आभासी पद्धतीने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे सदस्य बैठकीला उपस्थित होते. यावेळी महापौर दयाशंकर तिवारी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, अतिरिक्त पोलीस आयुक्त अस्वती दोरजे, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी. प्रामुख्याने उपस्थित होते. तर बैठकीला आभासी पद्धतीने खासदार डॉ. विकास महात्मे व आमदार विकास ठाकरे देखील हजर होते.

    गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारणार

    यावेळी बोलताना ऊर्जामंत्री म्हणाले की, सार्वजनिक गणेश मंडळांना अखंडीतपणे वीज पुरवठा मिळणार आहे. काही तांत्रिक बिघाड झाल्यास तो दूर करण्यासाठी वीज मंडळाचे कर्मचारी तत्पर राहतील. सार्वजनिक गणेश मंडळे या काळात तात्पुरता वीज पुरवठा घेतात. गणेशोत्सव काळात वापरलेल्या विजेसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती वीज दर आकारला जाणार असल्याची घोषणा डॉ. राऊत यांनी केली.