What I am is an honest confession of MP Praful Patel because of Pawar

नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीत (Maha vikas aghadi) काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि एनसीपी (NCP) कडून पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत.

    नागपूर:  काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) सध्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या रडारवर आहेत. नाना पटोले यांच्या स्वबळाच्या नाऱ्यानंतर महाविकास आघाडीत (Maha vikas aghadi) काही आलबेल नसल्याचं चित्र निर्माण झालं आहे. त्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि एनसीपी (NCP) कडून पटोलेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया येत आहेत.

    आज राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel) यांनी आज पटोले यांच्या विधानांवर प्रतिक्रिया दिली आहे. नाना पटोले काय बोलतात त्यावर रोज आम्ही काय बोलणार? मला शोभा नाही देत. योग्य वाटत नाही. पवारांनी व्यवस्थित उत्तर दिले आहे, अशी प्रतिक्रिया प्रफुल्ल पटेल यांनी दिली आहे.

    आम्ही काँग्रेस हायकमांडचे प्रतिनिधी असलेल्या एच. के. पाटील यांच्या बोलण्याला महत्त्व देतो. बाकीचे काय बोलतात त्याला महत्त्व नाही, अशा शब्दांत पटेल यांनी पटोलेंना टोला लगावला आहे.