लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान सुविधा तयार ठेवा, पालकमंत्री राऊत यांचे निर्देश

ग्रामीण भागात करोना चाचणी व लसीकरणावर भर (corona testing and vaccination in rural areas) देण्यात यावा. तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा (the confusion in the minds of the people) असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (The Guardian Minister Nitin Raut) यांनी केले. पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी या तालुक्यांचा दौरा केला. (Ramtek and Parshivani talukas) यावेळी तेथील आरोग्य सुविधा व लसीकरणाच्या स्थितीची माहिती (the health facilities and the status of vaccination) जाणून घेतली.

    नागपूर (Nagpur).  ग्रामीण भागात करोना चाचणी व लसीकरणावर भर (corona testing and vaccination in rural areas) देण्यात यावा. तसेच लोकांच्या मनात लसीकरणाबाबत असलेला संभ्रम दूर करावा (the confusion in the minds of the people) असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत (The Guardian Minister Nitin Raut) यांनी केले. पालकमंत्र्यांनी रविवारी जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी या तालुक्यांचा दौरा केला. (Ramtek and Parshivani talukas) यावेळी तेथील आरोग्य सुविधा व लसीकरणाच्या स्थितीची माहिती (the health facilities and the status of vaccination) जाणून घेतली. कन्हान, देवलापार व पारशिवनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना (the primary health centers) त्यांनी भेटी दिल्या.

    पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी कन्हान येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे करोना बाधित किती लोक आहेत व किती लोकांचे लसीकरण झाले, याचीही माहिती त्यांनी घेतली. रामटेक तालुक्यातील देवलापार या आदिवासीबहुल गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांशी त्यांनी चर्चा केली. काही गैरसमजुतींमुळे लसीकरण कमी होत असल्याचे वृत्त असल्याने नागरिकांनी या भ्रामक कल्पना मनातून काढून टाकाव्यात. लसीकरणामुळे कुणीही आजारी पडत नाही किंवा मृत्यू येत नाही.

    करोनापासून आपल्याला स्वत:चा बचाव करावयाचा असेल तर लसीकरण हाच एकमेव उपाय आहे, असे डॉ. राऊत यांनी नागरिकांना सांगितले. यावेळी पालकमंत्र्यांनी डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. तिसऱ्या लाटेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोणत्या सुविधा आहेत. याची माहिती जाणून घेतली. लहान मुलांवर उपचार करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांत किमान सुविधा तयार ठेवा, असे निर्देशही त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले.

    या दौऱ्यात पालकमंत्र्यांसोबत आमदार आशीष जयस्वाल, नागपूर जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मी बर्वे, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकार योगेश कुंभेजकर, माजी राज्यमंत्री व नागपूर जिल्हा ग्रामीण काँग्रेस समितीचे अध्यक्ष राजेंद्र मुळक, काँग्रेस नेते गज्जू यादव, राजा करवाडे, अनिल करवाडे, मुजीब पठाण, राजा तिडके, साजा सेठ आदी उपस्थित होते.