रोख रक्कम देऊन औषधांची खरेदी; तरीही रुग्णांच्या नातेवाईकांना वाढील शुल्काचे बिल दिले; मनपाचा दणका, पैसे परत करण्याचे रुग्णालय व्यवस्थापनास दिले आदेश

कोरोनाचा उपचार (receiving corona treatment) घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव शुल्क घेणे (he increased fees charged by relatives of patients) एका हाॅस्पिटलला चांगलेच महागात पडले; या प्रकरणी रुग्णाच्या मुलाने माजी महापौरांकडे (The municipal commissioner) रीतसर तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्तही सक्रिय झाले आणि रुग्णालयाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका प्रशासनाने (Municipal administration) प्राथमिक तपासानांतर (after preliminary investigation) रुग्णालय व्यवस्थापनास (the hospital management) उपचाराच्या नावाखाली घेण्यात आलेले 2 लाख 64 हजार 540 रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत.

    नागपूर (Nagpur).  कोरोनाचा उपचार (receiving corona treatment) घेणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांकडून वाढीव शुल्क घेणे (he increased fees charged by relatives of patients) एका हाॅस्पिटलला चांगलेच महागात पडले; या प्रकरणी रुग्णाच्या मुलाने माजी महापौरांकडे (The municipal commissioner) रीतसर तक्रार केल्यानंतर महापालिका आयुक्तही सक्रिय झाले आणि रुग्णालयाविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली. महापालिका प्रशासनाने (Municipal administration) प्राथमिक तपासानांतर (after preliminary investigation) रुग्णालय व्यवस्थापनास (the hospital management) उपचाराच्या नावाखाली घेण्यात आलेले 2 लाख 64 हजार 540 रुपये परत करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय रुग्णालयाने रुग्णाची फसवणूक केल्याप्रकरणी सदर पोलीस ठाण्यात उपायुक्त निर्भय जैन (Deputy Commissioner Nirbhay Jain) यांनी तक्रार दिली.

    नागपुरातील जयेश साखरकर यांच्या वडिलांना करोनामुळे विम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल करण्यापूर्वी रुग्णालयाने मागणी केल्यानुसार साडेचार लाख रुपये दिले. दोन दिवस आयसीयूमध्ये आणि दोन दिवस प्राणवायू खाटेवर उपचार करण्यात आल्यानंतर प्रकृती ठीक असल्यामुळे सुटी देण्यात आली.

    सुटी देताना रुग्णालयाने फार्मसीचे १ लाख १९ हजार २१८ रुपयांचे देयक दिले. रुग्णालयात दाखल असताना वेळोवेळी रोख देऊन औषध घेतल्यानंतरही इतके पैसे कसे झाले, अशी विचारणा करण्यासाठी गेले असता रुग्णालयाचे प्रमुख डॉ. राजेश सिंघानिया यांनी ५० हजार रुपये देऊन टाका असे सांगितले. आधीच साडेचार लाख अग्रीम रक्कम दिली असताना आता पुन्हा ५० हजार रुपये देण्यास सांगितल्यावर साखरकर यांनी रुग्णालयाला देयके मागितली असता सिंघानिया यांनी देयके देण्यास नकार दिला. यासंदर्भात जयेश साखरकर यांनी माजी महापौर संदीप जोशी यांच्याकडे तक्रार केली आणि डॉक्टरांसोबत झालेल्या संवादाचे सगळे पुरावे दिले. त्यानंतर जोशी यांनी अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांची भेट घेत माहिती सांगितली. अखेर अंकेक्षकांच्या माध्यमातून प्राथमिक चौकशी करीत रुग्णाचे २ लाख ६४ हजार ५४० रुपये रुग्णालयाने परत करावे, असे निर्देश देण्यात आले.

    रुग्णालयाने साखरकर या रुग्णांची फसवणूक केल्यामुळे त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यासंदर्भात पत्र सदर पोलीस ठाण्यास देण्यात आले. आता या रुग्णालयासह शहरातील अन्य खाजगी रुग्णालयांवर महापालिका प्रशासनाने नियुक्त केलेल्या समितीकडून कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.