पतीच्या बाहेरख्यालीपणा आणि दारूच्या व्यसनाने झाला राणे कुटुंबीयांचा नाश; नागपुरातील राणे कुटुंबियांच्या मृत्यू प्रकरणात धक्कादायक बाब समोर

दारूच्या आहारी गेल्यामुळे प्रा धीरज महाविद्यालयातही नियमितपणे जात नव्हते. कुटुंबाची अशी अवस्था पाहून डॉ सुषमा यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय केलाच त्याचवेळी दोन्ही मुलांना आणि पतीलाही संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतः नोकरी करत असलेल्या रुग्णालयातून कुत्र्याला मारण्यासाठीचे इंजेक्शन मिळविले होते.

नागपूर. डॉक्टर सुषमा राणे या महिलेने नवरा धीरज, मुलं ध्रुव आणि लावण्या यांची इंजेक्शन देऊन हत्या केली. त्यानंतर सुषमा राणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. १८ ऑगस्टच्या दुपारी कोराडी परिसरातील जगनाडे लेआऊटमधील राहत्या घरी राणे कुटुंब मृतावस्थेत आढळले होते. डॉ.सुषमा यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले हा प्रश्न सगळ्यांचा चक्रावून टाकणारा होता. उच्चभ्रू आणि सुशिक्षित कुटुंबियात घडलेल्या या घटनेनेबद्दल अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. परंतु आता पोलीस तपासात धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार वैयक्तिक आयुष्यातील नैराश्य, पतीच्या वाईट सवयी त्यामुळे होणाऱ्या कौटुंबिक कलहामुळे डॉ सुषमा राणे यांनी पती प्राध्यापक धीरज राणे आणि दोन्ही मुलांना आधी विषाचे इंजेक्शन दिले आणि त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली.

फॉरेन्सिक पुरावे, घटनेच्या आधीच्या काही काळातील घटनाक्रम तसेच प्रा. धीरज आणि डॉ सुषमा यांच्या मोबाईल फोन्सचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी डॉ सुषमा यांनी पती आणि दोन्ही मुलांची आधी विषाचे इंजेक्शन देऊन हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावल्याचे निष्पन्न झाले आहे. आर्थिक दृष्ट्या सुखवस्तू राणे कुटुंबात पती पत्नीचे संबंध चांगले नव्हते. प्रा धीरज पत्नीवर संशयच घ्यायचे. त्यांची स्वतःची वर्तवणूक चांगली नव्हती. त्यांचा बाहेरख्यालीपणा, दारूचे अति व्यसन कुटुंबात कलहाचे प्रमुख कारण बनले होते.

दारूच्या आहारी गेल्यामुळे प्रा धीरज महाविद्यालयातही नियमितपणे जात नव्हते. कुटुंबाची अशी अवस्था पाहून डॉ सुषमा यांनी स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय केलाच त्याचवेळी दोन्ही मुलांना आणि पतीलाही संपवण्याचा निर्णय घेतला. घटनेच्या एक दिवसाआधी म्हणजेच १७ ऑगस्ट रोजी त्यांनी स्वतः नोकरी करत असलेल्या रुग्णालयातून कुत्र्याला मारण्यासाठीचे इंजेक्शन मिळविले होते. त्यांच्या घरातला कुत्रा त्रास देत असल्याचे कारण सांगून डॉ सुषमा यांनी हे इंजेक्शन मिळविले होते. मात्र, त्यांनी त्या इंजेक्शनचा वापर स्वतःच्या कुटुंबियांवर केला. पती सह दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्यानंतर डॉ सुषमा यांनी शेजारील खोलीत जाऊन गळफास घेतला होता.