बिल्डरच्या घरात शिरून मागितली ५० लाखाची खंडणी; कुटुंबीयांना ओलीस धरल्यानंतर पोलिसांनी ‘अशा’प्रकारे केली सुटका

बिल्डरच्या घरात (The builder house) घुसून त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ओलिस ठेवण्यात आले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा फाटा (in Pipla Fata) परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली.

    नागपूर (Nagpur).  बिल्डरच्या घरात (The builder house) घुसून त्याच्या कुटुंबीयांना ५० लाख रुपयांच्या खंडणीसाठी ओलिस ठेवण्यात आले. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पिपळा फाटा (in Pipla Fata) परिसरात घडली. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली. पोलिसांनी प्रसंगावधान राखत वरच्या माळ्यावरून प्रवेश करीत आरोपीला शिताफीने अटक केली.

    जितेंद्र तुळशीराम बिसेन (१९) असे आरोपीचे, तर राजू रघुजी वैद्य (५१) असे फिर्यादीचे नाव आहे. जितेंद्र कॅटरिंगची कामे करायचा. लॉकडाउनमुळे तो सहा महिन्यांपासून बेरोजगार आहे. त्यासाठी एखाद्या श्रीमंत व्यक्तीकडून खंडणी वसूल करण्याचा शॉर्टकट त्याने निवडला. त्याने वैद्य यांच्या घरातील सर्व सहा महिलांना ओलिस ठेवून ५० लाखांची खंडणी मागितली.

    पोलिस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, गुन्हेशाखा उपायुक्त गजानन राजमाने, सहाय्यक आयुक्त नीलेश पालवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रताप भोसले व साध्या वेशातील पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घराच्या मागच्या बाजूला दहीहंडीप्रमाणे एकमेकांच्या खांद्यांवर उभे राहून पोलिस पहिल्या माळ्यावर चढले व घरात शिरून सर्वांची सुटका केली.