आरोपीने पीडितेशी केला विवाह; न्यायालयाने कोणता निर्णय घेतला?

    नागपूर (Nagpur). आरोपीने (The accused) बलात्काराचा खटला (the rape case) सुरू असतानाच पीडितेशी विवाह (married the victim) केला. शेवटी या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने (the Nagpur bench of the High Court) दोषारोपपत्र (the chargesheet) रद्द करण्याचे आदेश दिले. पीडिता व आरोपी अनेक वर्षांपासून प्रेमसंबंधात होते.

    २०२० मध्ये आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. दरम्यान, त्याने लग्नास नकार दिल्याने तिने त्याच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दिली. त्यावेळी ती १७ वर्षांची होती.

    या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध बलात्कार व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. याप्रकरणी सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करून खटला सुरू झाला. दरम्यान, पीडिता १८ वर्षांची झाली व आरोपीने तिच्याशी विवाह केला. त्यांनी उच्च न्यायालयात अर्ज करून गुन्हा रद्द करण्याची विनंती केली. न्यायालयाने सर्व पक्षांची बाजू ऐकल्यानंतर व पीडितेने गुन्हा रद्द करण्याला सहमती दर्शवताच दोषारोपपत्र रद्द केले.