दुर्मिळ ‘काळा बिबटय़ा’ नवेगाव-नागझिऱ्यात आढळला; जाणून घ्या काय आहे या प्राण्याचे वैशिष्ट्य? वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकारांमध्ये उत्साह

नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील (the Navegaon-Nagzira Tiger Reserve) नवेगाव क्षेत्रात दुर्मीळ असा काळा बिबटय़ा (A rare black leopard) आढळला आहे. विशेष म्हणजे, यावेळी एक सामान्य बिबटय़ाही या काळ्या बिबटय़ाबरोबर फिरत होता.

  नागपूर (Nagpur).  नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातील (the Navegaon-Nagzira Tiger Reserve) नवेगाव क्षेत्रात दुर्मीळ असा काळा बिबटय़ा (A rare black leopard) आढळला आहे. विशेष म्हणजे, यावेळी एक सामान्य बिबटय़ाही या काळ्या बिबटय़ाबरोबर फिरत होता. यापूर्वी २०१९ मध्ये ताडोबा-अंधारी (an ordinary leopard) व्याघ्रप्रकल्प, २०२० मध्ये पेंच व्याघ्र प्रकल्प (the Pench tiger project) आणि सिंधुदुर्गातील आंबोली घाटात (the Amboli ghat in Sindhudurg) काळा बिबटय़ा आढळल्याची नोंद आहे.

  ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा काळा बिबटय़ा आढळला तेव्हा अनेक तर्कवितर्क लढवण्यात आले. मात्र, काळा बिबटय़ाही सर्वसाधारण बिबटय़ाच असून ती वेगळी प्रजाती नसल्याचे त्या वेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट होते. शरीरात ‘मॅलनीन’ रंगद्रव्य अधिक प्रमाण असल्यास शरीर काळे दिसते. त्यामुळे बिबटय़ाच्या शरीरावरील ठिपकेही दिसत नाहीत. ताडोबा व्याघ्रप्रकल्पात नंतर तो अनेकदा दिसला. पेंच व्याघ्रप्रकल्पात पहिल्यांदा पर्यटकांना काळा बिबटय़ा दिसला, पण त्याचे दर्शन काही सेकंदांचेच होते, त्यामुळे त्यांचे छायाचित्र काढता आले नव्हते. त्यानंतर मात्र पर्यटकांच्या कॅमेऱ्यांनी त्याला कैद केले. तेव्हापासून काळ्या बिबटय़ाला पाहण्यासाठी ताडोबाकडे जाणारे पर्यटक नंतर पेंच व्याघ्रप्रकल्पाकडे वळू लागले.

  काळा बिबटय़ा आता नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पातही आढळल्याने वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकारांमध्ये उत्साह संचारला आहे, मात्र पावसाळ्यात पर्यटन बंद असल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

  सोमवारी भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब यांनी ‘ट्विीटर’वर छायाचित्र प्रसारित केल्यानंतर नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात काळा बिबटय़ा आढळल्याची माहिती जगजाहीर झाली. प्रत्यक्षात तीन महिन्यांपूर्वीच हे छायाचित्र मिळाले होते. मात्र, व्यवस्थापनाने सुरुवातीला समाजमाध्यमांवर माहिती जाहीर के ली आणि लगेच काढूनही टाकली होती. आता डॉ. बिलाल हबीब यांनी हे छायाचित्र समाजमाध्यमावर टाकल्यानंतर व्यवस्थापनाने ही बाब मान्य के ली.

  छायाचित्र डेहरादूनला
  या काळ्या बिबटय़ाचे छायाचित्र डेहरादून येथील भारतीय वन्यजीव संस्थेकडे विश्लेषणासाठी ते पाठवण्यात आले आहे. अलीकडेच भारतीय वन्यजीव संस्थेचे वैज्ञानिक डॉ. बिलाल हबीब यांनी ‘ट्विटर’वरून हे छायाचित्र प्रसिद्ध के ले होते, अशी माहिती नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य वनसंरक्षक आणि क्षेत्रसंचालक आर. एम. रामानुजम यांनी दिली.

  काळेपण कशामुळे ?
  काळा बिबटय़ा ही मार्जार जातीतील वेगळी प्रजाती नाही, तर तो सर्वसाधारण बिबटय़ाच आहे, असे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याआधीच स्पष्ट केले आहे. शरीरात ‘मॅलनीन’ रंगद्रव्याचे प्रमाण अधिक असल्यास शरीर काळे दिसते. त्यामुळे बिबटय़ाच्या शरीरावरील ठिपके ही दिसत नाहीत, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्प जाहीर होण्याआधी २०१२मध्ये ज्या नवेगाव अभयारण्याची घोषणा करण्यात आली, त्या ठिकाणी काळा बिबटय़ा आढळला आहे.
  सावन बाहेकर, मानद वन्यजीव रक्षक, गोंदिया